शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अन् परतला चेहऱ्यावर आनंद ! : अमेरिकेच्या डॉक्टरांनी यशस्वी केल्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:10 AM

जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला.

ठळक मुद्देजैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्या वतीने नि:शुल्क प्लास्टिक सर्जरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुभंगलेले ओठ, कापलेले कान, गालावरील काळा डाग यासारख्या विद्रुपतेला चेहऱ्यावर घेऊन जगताना जीवाची फार तगमग होते. पाहणाऱ्यांच्या बोचणाऱ्या नजरेला सामोरे जावे लागते. यावर शस्त्रक्रिया हाच उपाय. परंतु शस्त्रक्रियेसाठी येणारा साधारण लाख रुपयांपर्यंतचा खर्च अनेकांना पेलवत नाही. याची गंभीरता ओळखून जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला.मनोहरलाल ढ्ढ्ढा यांच्या स्मृतिनिमित्त पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये आयोजित या दोन दिवसीय शिबिराला शांतादेवी मनोहरलाल ढ्ढ्ढा, अनिश छाजेड व सावन भटेवरा कुटुंबाचे, टॉपवर्थ ग्रुपचे व वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विशेष सहकार्य मिळाले.शिबिराचे उद्घाटन सोमवारी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, गो गॅसचे प्रमुख नितीन खारा, वर्धमान बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, टॉपवर्थ ग्रुपचे संचालक सुरेंद्र लोढा, उपमहापौर मनिषा कोठे, भवानी हॉस्पिटलचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, सचिव नितीन अरसापुरे, जैन क्लब अध्यक्ष डॉ. सुनील पारख, सचिव राजन ढ्ढ्ढा व समाजसेवक शरद बागडी प्रामुख्याने उपस्थित होते.महापौर जोशी म्हणाले, अशा शिबिरातून समाजसेवेला बळ मिळते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे. पुढील वर्षी या आयोजनात महानगर पालिकेचाही सहभाग असेल, असे आश्वासन देत त्यांनी जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुकही केले. यावेळी आ. खोपडे, आ. मते व नितीन खारा यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सुनील पारख यांनी केले. जैन क्लबच्या मदतीने गेल्या चार वर्षांपासून हे नि:शुल्क कार्य सुरू असल्याचेही ते म्हणाले. संचालन रजनीश जैन यांनी केले तर आभार सचिव राजन ढ्ढ्ढा यांनी मानले.पहिल्याच दिवशी १८०० वर रुग्णांची नोंदणीजैन क्लबचे जनसंपर्क अधिकारी अतुल कोटेचा यांनी सांगितले, पहिल्याच दिवशी १८०० वर रुग्णांची नोंदणी झाली. या रुग्णांवर अमेरिकेचे प्लास्टिक सर्जन डॉ. लॉरी बिस्टॉन, भवानी हॉस्पिटलचे डॉ. अमोल पटेल, मुकेश हटवार, संगीता बिजलानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेद्वारे चेहऱ्यावरील विद्रुपता दूर केली. मंगळवार १४ जानेवारी रोजीसुद्धा उर्वरित शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जातील.विदर्भासोबतच अन्य राज्यातून आले रुग्णविदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेशसह आजूबाजूच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यासाठी या राज्यात प्रचार करण्यात आला होता. आयोजकांकडून रुग्णासोबतच त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी कौतुक केले.यांनी दिली सेवाशिबिराच्या आयोजनात शिबिराचे संयोजक सुभाष कोटेचा, शैलेश लश्करे, हेमेन्द्र बदानी, राजय सुराणा, संजय नाहटा, संतोष गेल्डा, धीरज मालू, शैलेंद्र मरोठी, मनीष छल्लाणी, प्रमोद तातेड, सुधीर सुराणा, अनिश छाजेड, हर्षित भन्साली, नरेश भरुट, नागेश आसानी, गौतम कोठारी, विनोद कोचर, प्रमोद कांकरिया, रमेश कोचर आदींनी आपली सेवा दिली.

टॅग्स :Americaअमेरिकाdoctorडॉक्टर