शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

... अन् म्हणून प्रवासी करतो ‘वंदे भारत’ला नमन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:08 PM

प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे.

नागपूर : मध्य भारतातील नागपूर ते बिलासपूर या मार्गावर सुरू झालेल्या हाय स्पिड वंदे भारत ट्रेनमध्ये ईतक्या सोयी, इतक्या सुविधा आहेत. तिचे इतके वैशिष्ट्ये आणि धक्का न लागू देता ती प्रवाशांना त्यांच्या ईच्छित स्थानकावर सोडते. म्हणूनच प्रवासी वंदे भारतला नमन केल्याशिवाय राहत नाही.

११२८ प्रवासी आणि चालकांसह चार कर्मचारी अशी एकूण ११३२ ची क्षमता असलेली वंदे भारत फेब्रुवारी २०१९ ला सर्वप्रथम दिल्ली वाराणसी, नंतर दिल्ली कटरा, नंतर मुंबई गांधीनगर कॅपिटल, दिल्ली अम्ब अंदोरा, चेन्नई म्हैसूर आणि आता आजपासून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस आहे. हिची बनावट पूर्णत: स्वदेशी आहे. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (पीआयएस) आणि स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे आहेत. 

प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे. हिच्यात इमर्जन्सी अलार्म बटण आणि इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्ससुद्धा आहे. त्यामुळे प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही देण्यात आले आहेत. यात प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे देखील आहेत. ज्यात डब्याच्या बाहेर रीअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

ही सुद्धा आहेत वैशिष्ट्ये...- इतर प्रवासी माध्यमांच्या तुलनेत नागपूर ते बिलासपूर दरम्यान रेल्वे प्रवासाचा वेळ वाचेल.- सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न.- गँगवेचे बाह्य फेअरिंग अशा प्रकारे डिझाइन केले गेले की ते हवेचा भार कमी करेल.-गरमागरम जेवण, शितपेय, वायफाय ऑन डिमांड

असे आहे एक्झिकेटिव्ह भाडेनागपूर - गोंदिया : ९३५ रुपयेनागपूर - राजनांदगाव : १३०५ रुपये

नागपूर - दुर्ग : १४२० रुपयेनागपूर - रायपूर : १५४० रुपये

नागपूर - बिलासपूर : १८९० रुपये

सर्वसाधारण भाडे

नागपूर - गोंदिया : ४८० रुपयेनागपूर - राजनांदगाव : ६६० रुपयेनागपूर - दुर्ग : ७२० रुपयेनागपूर - रायपूर : ७७५ रुपयेनागपूर - बिलासपूर : ९५५ रुपये

आठवड्यातून सहा दिवसही रेल्वेगाडी आठवड्यातून ६ दिवस चालणार आहे. नागपूरहून ती रोज (शनिवार वगळता) दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि रात्री ७.३५ वाजता बिलासपूरला पोहचेल. तर, बिलासपूरहूनसकाळी६.४५ वाजता सुटेल आणि नागपुरात दुपारी १२.१५ वाजता पोहचेल. रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकावर हिचे थांबे राहणार आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस