शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

प्रवेशद्वार न उघडल्यामुळे संताप, कर्मचाऱ्याने केली सुरक्षारक्षकाची हत्या

By योगेश पांडे | Published: October 21, 2024 4:59 PM

मालकांनी प्रकरण लपविण्याचा केला प्रयत्न : सीसीटीव्ही व डीव्हीआरदेखील काढले

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंपनीचे प्रवेशद्वार न उघडल्याच्या संतापातून एका कर्मचाऱ्याने तेथील सुरक्षारक्षकाची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली. या प्रकरणात कंपनीच्या मालकांनी गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करत पोलिसांची दिशाभूल केली होती. अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर सुरक्षारक्षकाची हत्या झाल्याची बाब समोर आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

एमआयडीसीमध्ये उज्वल ईस्पात प्रायव्हेट कंपनी आहे. तेथे ८ ऑक्टोबर रोजी कमलेश रामसुजन पटेल (५०) यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेण्यात आले होते. चौकशीदरम्यान ही हत्या असल्याची बाब स्पष्ट झाली. ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता कंपनीचे प्रवेशद्वार लवकर उघडले नाही यावरून मनोहर उर्फ मनोज बबन बेंडे (४२, बाभुळगाव, यवतमाळ) याने पटेल यांची लोखंडी रॉडने प्रहार करत हत्या केली होती. त्यानेच त्यांना माल सुरेश चंदानी व धर्मेश चंदानी यांच्या सांगण्यावरून मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेले. १० ऑक्टोबर रोजी पटेल यांचा मृत्यू झाला होता. कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर मालकांनी काढून टाकला आणि बेंडेला पैसे देऊन कंपनीतून पळवून लावल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला व बेंडेला अटक केली आहे. कंपनीच्या मालकांना अद्यापही अटक झाली नसून पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर