शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भर पावसात अनिल देशमुखांनी गाजवली सभा, भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 6:17 PM

अनिल देशमुख यांनी भर पावसात सभेला संबोधित केले

नागपूर : काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे विविध कामांचे भूमीपूजन कार्यक्रम सोहळा नुकताच पार पडला. माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेतेअनिल देशमुख यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यानिमित्त गावातील बाजार चौकात रात्रीच्या वेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख यांच्या भाषणाच्यावेळी पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यामुळे कार्यक्रम गुंडाळला जाईल असे वाटत होते. मात्र अनिल देशमुखांनी भर पावसात भाषण सुरूच ठेवले. तब्बल ३० मिनीटे त्यांनी भाषण केले. 

कचारी सावंगा येथे ३० जूनरोजी पाणंद रस्ता भूमीपूजन, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी भूमीपूजन आणि सिमेंट रस्ता भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ७ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला निलेश दुबे यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी भाषणे केली. त्यानंतर देशमुख यांच्या भाषणावेळी पावसाला सुरूवात झाली. नागरिकांनी आपल्या खुर्च्या सोडून मंदिराचा आसरा घेतला. परंतू देशमुख यांनी जागा सोडली नाही व पावसात ३० मिनीटे उभे राहून भाषण ठोकले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात केलेलं भाषण चांगलच गाजलं होतं. त्यांचा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते. या भाषणातून त्यांनी आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. अशाचप्रकारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रेच्या वेळी जम्मू काश्मीर येथे वादळी बर्फवृष्टी सुरू असताना भाषण केलं होतं. त्यांचही हे भाषण चांगलंच गाजलं. राहुल गांधींचं बर्फवृष्टी दरम्यान झालेलं भाषण पाहून अनेक नेटकऱ्यांनी शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण केली. तर आता अनिल देशमुखांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून परिसरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसRainपाऊसnagpurनागपूर