लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दुपारी शहरातील कोरोनाबाधित हॉटस्पॉटला भेटी देऊन त्या परिसराबाबत अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. त्यांनी मेयो हॉस्पीटल, सतरंजीपुरा, मोमिनपुरा आदी भागांना भेटी दिल्या. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा शंभर गाठत असताना व विदर्भात तो दिडशेहून पुढे गेला असताना, अधिक काळजी घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व गरजेपुरतेच बाहेर पडणे या दोन बाबींवर त्यांनी अधिक भर दिला.विदर्भात यवतमाळ व नागपूर हे दोन्ही जिल्हे कोरोनाबाधितांच्या बाबतीत पुढे असल्याचे दिसते. तर वर्धा, गडचिरोली व भडारा या ठिकाणी अद्याप कोरोनाची लागण नसल्याचे आढळले आहे.
अनिल देशमुख यांनी केली उपराजधानीतील हॉटस्पॉटची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:32 PM