शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीत कुठलीही गडबड नाही

By कमलेश वानखेडे | Published: April 18, 2023 5:56 PM

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही, सर्वकाही ठीक आहे, अजित पवार यांच्याबाबतच्या सर्व चर्चा हा वावड्या आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला.

कमलेश वानखेडेनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही, सर्वकाही ठीक आहे, अजित पवार यांच्याबाबतच्या सर्व चर्चा हा वावड्या आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला.

देशमुख म्हणाले, नागपूरच्या सभेत अजित पवार का बोलले नाही, याचे कारण त्यांनी सभेआधीच सांगितले होते. त्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी बोलणार, असे ठरले होते. अधिवेशनात पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. सरकारवर सडकून टीका केली. त्यामुळे कुठल्याही चर्चेत काही अर्थ नाही.

संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या दाव्याबाबत विचारणा केली असता देशमुख म्हणाले, राऊत यांनी संपादकीय मध्ये काय लिहिले हे माहीत नाही. राऊत हे दोन दिवसांपूर्वीच आपल्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी अशी कुठलीही माहिती त्यांनी दिली. शरद पवार हे २३ एप्रिल रोजी काही कार्यक्रमानिमित्त विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात आपणही सहभागी होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAjit Pawarअजित पवार