लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपविली असून ती पूर्णत्वास नेण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे ते यावेळी म्हणाले. विमानतळावर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.अनिल देशमुख हे १९७० पासून युवक कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाले. या काळात युवक काँग्रेसचा देशभरात जोर होता. मे १९९२ मध्ये देशमुख हे पंचायत समितीची निवडणूक लढले व सभापती झाले. २३ मे ते ९ जून १९९२ या काळात सभापती राहिलेले देशमुख ९ जुलै १९९२ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला व त्याचवेळी देशमुख यांना लाल दिवा मिळाला होता.
अनिल देशमुख यांचे नागपुरात उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:35 AM