नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने लूक आउट नोटीस काढली आहे. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने कायद्याच्या दृष्टीने देशमुख यांनी चौकशीला समोर जावे, तेच योग्य होईल, असे मत करुणा शर्मा यांच्या गाडीत बंदूक मिळणे, नंतर ती ठेवल्याचा व्हिडिओ समोर येणे हा सर्व प्रकार गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची दाबावाविना सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचे कारण नाही. तिथे जी घटना घडली आहे, त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली जात आहे हे स्पष्ट होत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
महाविकास आघाडी ही उत्तम प्रशासन देण्यासाठी झालेली नसून सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते जमले नाही तर आपसात लचके तोडा असे त्यांचे सुरू आहे, असा चिमटाही फडणवीस यांनी घेतला.