नरेश डोंगरे
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीवरून सलग दोन दिवस फोन करून धमकी दिल्याच्या प्रकरणाने तपास यंत्रणांसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे फोन डी कंपनीकडून आले, ते सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आले, की कंगना रनौत प्रकरणात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांसोबतच राज्यातील तपास यंत्रणेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.दुबईहून फोन आल्यामुळे ते डी कंपनीकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. अभिनेत्री कंगना हिने मुंबई पोलिसांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी 'ज्यांना मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही. त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्यावरून सर्वत्र चर्चेचे रान पेटले आहे. त्यामुळे कंगनाच्या समर्थकांनी हे फोन केले असावे, असाही शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे. या संबंधाने कसून तपास केला जात आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांच्या मोबाईलवर जे फोन आले ते 'व्हॉईस कॉल इंटरनेट प्रोटोकॉल' (व्हीओआयपी) च्या माध्यमातून करण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. इंटरनेटच्या माध्यमातून असे कॉल केले जातात. त्यामुळे त्याची आयडी स्पष्ट होत नाही. हा कॉल करणाऱ्याचा छडा लावण्याचे काम क्लिष्ट असल्याचेही अधिकारी सांगतात.शनिवारी रात्री दुबईहून आलेल्या चारपैकी दोन कॉलवर बोलणे झाले. त्याचे संभाषण पुढीलप्रमाणे आहे.कॉलर : ये अनिल देशमुखजी का नंबर है क्या?कोठेकर : नहीं,आप कौन बात कर रहे ...कॉलर : मुझे पता है, ये अनिल देशमुखजीकाही नंबर है...कोठेकर : नहीं, मै देशमुखजी का पीए बोल रहा हूं... आप कौन बोल रहे...?कॉलर : वो छोडिये, ये बताईये होम मिनिस्टरजी का ही नंबर है ना ...कोठेकर : मै उनका पीए बोल रहा हूं... आप नाम बताईये, कुछ मेसेज हो तो बताईए...कॉलर : नाम में क्या रखा है... मेरी उन से बात करवा दिजिए.कोठेकर : हां, करवा देता हूं, आप अपना नाम बताईये...कॉलर : मैं दुबई से बात कर रहा हूं. उनसे कहिए.. जरा संभल के रहे... नही तो ठीक नही होगा!कोठेकर यांच्याशी एक मिनिटे, ३४ सेकंद बोलणाऱ्या कॉलरने +६२७०५२७ या नंबरवरून फोन केला होता.रविवारी दुपारी १२. १५ वाजतासिव्हिल लाईन्समधील बंगल्याच्या लॅण्डलाइनवर फोन आला. हा फोन करणाऱ्याचा नंबर ९३१५७३७२८९ असून त्याचे नाव संजयसिंग ठाकूर असल्याचे समजते.