शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

आयकर विभागाच्या धाडीने अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 7:15 PM

Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा नागपूर, काटोल आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या.

ठळक मुद्देनागपूर, काटोल येथील घर व कार्यालयात तपासणीरोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा नागपूर, काटोल आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. या धाडीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. ही कारवाई आयकर विभागाच्या मुंबई आणि नागपूर येथील अधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले. (Anil Deshmukh's troubles increase due to income tax department's raid)

शुक्रवारी सकाळी अनिल देशमुखांच्या रामदासपेठ येथील मिडास हाईट्समधील कार्यालय आणि फेटरीजवळील एनआयटी कॉलेज व नागपूर आणि काटोल येथील घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी धाडी टाकल्या. रोख आणि काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या धाडीत मुंबई आणि नागपूर विभागाचे २० पेक्षा जास्त अधिकारी सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले. धाडसत्रामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

ईडी आणि आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे अनिल देशमुखांना दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्यातरी दिसून येत नाही. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणा त्यांच्या भोवताल आणखी घट्ट फास आवळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने लुकआऊट नोटीस जारी केल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाचे संचालक एस.एस. परिडा यांनी धाडीसंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला. केवळ चौकशी व तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यावर त्यांनी बोलण्यास टाळले. पुढे कळेलच, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखIncome Taxइन्कम टॅक्स