शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार महालक्ष्मे, नानिवडेकर यांना प्रदान

By admin | Published: September 12, 2016 3:06 AM

विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणार स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार

उल्लेखनीय कार्याचा सन्मान : विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रमनागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणार स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर-दर्शने आणि अविनाश महालक्ष्मे यांना रविवारी प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदीगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना त्यांच्या भविष्यातील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या भाषणात आजच्या पत्रकारितेवर विशेष भाष्य केले. आज तांत्रिक प्रगतीमुळे पत्रकारितेत सुबत्ता आली पण पत्रकारांची विश्वसनीयता कमी झाली आहे. त्यात पुन्हा पेड न्यूज या प्रकाराने नवीन भर घातली आहे. दुसरीकडे आजच्या पत्रकारितेसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा स्थितीत पत्रकारांनी त्यांच्या वाट्याला येणारी स्पेस विधायक पत्रकारितेसाठी वापरावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण चौधरी म्हणाले, मी तिकडे हरियाणात आहे. तिथे मराठी वृत्तपत्र वाचायला मिळत नाहीत. अशावेळी इंटरनेटवर ते वाचावे लागते. पण, सकाळी चहासोबत मुद्रित वृत्तपत्र वाचण्यात जो आनंद आहे तो ई-पेपर वाचण्यात नाही. यावेळी मृणालिनी नानिवडेकर-दर्शने आणि अविनाश महालक्ष्मे या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन सरिता कौशिक तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार जगतातील मंडळींसोबतच शहरातील अनेक गणमान्य नागरिकही उपस्थित होते. (प्रतिनिधी)