काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज
By कमलेश वानखेडे | Published: October 28, 2024 06:18 PM2024-10-28T18:18:33+5:302024-10-28T18:19:30+5:30
मध्य नागपुरातून लढणार : एबी फॉर्म मिळाला
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री व अ.भा. काँग्रेसचे सचिव अनिस अहमद यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते मंगळवारी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अनीस अहमद यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती; पण गेल्यावेळी फक्त चार हजाराने पराभूत झालेले अ. भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे अहमद नाराज झाले. काँग्रेसने पूर्व विदर्भात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मुस्लिमांनी फक्त काँग्रेसला मतेच द्यायची का, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर सोमवारी त्यांनी मुंबई येथे राजगृहावर जाऊन वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. अनिस अहमद यांनी यापूर्वी आमदार म्हणून दोन वेळा मध्य नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे.