शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

बलात्कारानंतर केला होता अंकिताचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:52 AM

नागपूरची इंजिनियर तरुणी अंकिता कनौजिया हिचा ठाण्यातील अंबरनाथ येथे बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आला होता. त्यानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून कर्नाटकच्या सीमेवरील निपाणी येथे फेकण्यात आला.

ठळक मुद्देसुटकेसमध्ये ठेवून कर्नाटकच्या सीमेवर फेकला होता मृतदेह : मित्रासह दोघाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरची इंजिनियर तरुणी अंकिता कनौजिया हिचा ठाण्यातील अंबरनाथ येथे बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आला होता. त्यानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून कर्नाटकच्या सीमेवरील निपाणी येथे फेकण्यात आला. या घटनेतील सूत्रधार तिचा मित्र निखिलेश प्रकाश पाटील (२४) आणि अक्षय अनिल वालदे (२४) आहे. हे दोघेही नागपूरचेच निवासी आहेत.यांना बुधवारी दुपारनंतर अंबरनाथ-शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.शहर पोलीस विभागातील हवालदार सुरेश कनौजिया यांची २४ वर्षीय मुलगी अंकिता हिचा ठाणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील अंबरनाथ येथे खून करण्यात आला. खुनानंतर मृतदेह कर्नाटकच्या सीमेजवळ फेकण्यात आला होता. आरोपीचा मित्र नीलेश भाऊराव खोब्रागडे (३८) याने मंगळवारी रत्नागिरी पोलिसांना खरी माहिती सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.अंकिता ऊर्फ हिना ही मूळची नागपूरची रहिवासी आहे. तिने काही दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ठाणे येथील कॉल सेंटरमध्ये तिला नोकरी लागली होती. ती ठाण्यातील एका होस्टेलमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती कुटुंबीयांची भेट घेऊन ठाण्याला परत गेली होती. तिची निखिलेश सोबत मैत्री होती. निखिलेश हा नागपुरातीलच ठेकेदार नीलेश खोब्रागडे यांच्याकडे काम करतो. ३ सप्टेंबरला नीलेश आणि निखिलेश हे मुंबईला आयोजित मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. या दरम्यान निखिलेशला अंकिताचा फोन आला. त्यावेळी अंकिता पुण्यात होती. निखिलेशने तिला पुण्याला घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. तो तिला पुण्यावरून ठाण्याला घेऊन आला. ४ सप्टेंबर रोजी तो तिला त्याचा मित्र अक्षय वालुदे याच्या अंबरनाथ येथील फ्लॅटवर घेऊन गेला. ते दोघेही फ्लॅटवरच थांबले. नीलेश तेथून आपल्या कामावर निघून गेला.असे सांगितले जाते की, नीलेश गेल्यानंतर निखिलेश व अक्षयने अंकितावर बळजबरी केली. तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरड करून शेजाºयांना बोलावण्याचा प्रयत्न केला. तिने दोघांनाही पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे दोघेही घाबरले. त्यांनी गळा आवळून अंकिताचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे काय करायचे असा प्रश्न पडला. त्यांनी एका सुटकेसची व्यवस्था केली. अंकिताचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना आखू लागले. दरम्यान त्यांनी नीलेशला फोन केला व गोवा फिरायला चलण्यासाठी विचारले.मिटिंगला वेळ असल्याने नीलेश तयार झाला. ४ सप्टेंबर रोजीच दोघेही नीलेशच्या कारमध्ये गोव्याला रवाना झाले. ते कोल्हापूर रोडने कर्नाटकच्या सीमेजवळील निपाणी येथे आले. तिथे मृतदेह फेकला. त्यानंतर नीलेशला निखिलेश व अक्षयच्या कृत्याबाबत समजले.५ सप्टेंबरला नीलेश रत्नागिरीला पोहोचला. तो आपली कार घेऊन थेट शहर पोलीस स्टेशनला गेला. तिथे त्याने निखिलेश व अक्षयच्या कृत्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी अंकिताचा बलात्कार करून खून केल्याचे कबूल केले. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अंकिताच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले.अंकिताचे वडील सुरेश कनोजिया शहर पोलिसात हवालदार आहेत. त्यांच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी आणि साथीदारांना रत्नागिरीसाठी रवाना करण्यात आले. बुधवारी सकाळी ते रत्नागिरीला पोहोचले. रत्नागिरी पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर निपाणी येथे फेकलेला मृतदेह ताब्यात घेतला.गोवा पोलिसांनी केले दुर्लक्षसूत्रानुसार नीलेशने निपाणी हे गोव्याच्या जवळ असल्याने तातडीने गोवा पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. परंतु गोवा पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. उलट तक्रार दाखल करून घेण्यासही नकार दिला. त्यामुळे नीलेशला धक्काच बसला. गोवा पोलिसांच्या संबंधित अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.पोलिसांनी केले होते मौन धारणरत्नागिरी पोलिसांनी खून, बलात्कार आणि पुरावे नष्ट केल्याबाबत गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी ठाणे पोलिसांना स्थानांतरित केले आहे. या प्रकरणाबाबत बुधवारीसुद्धा संभ्रमाची स्थिती होती. शहर पोलिसातील अधिकारी त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगत होते. तर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय कुमार यांनी हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे स्थानांतरित केल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळत होते. ठाणेदार चौधरी हे खूप प्रयत्न करूनही फोनवर उपलब्ध होत नव्हते. ठाणे पोलीस हे केवळ शिवाजीनगर येथे तक्रार दाखल असल्याचे सांगत होते. एकूणच पोलीस कर्मचाºयांशी संबंधित अतिशय संवेदनशील प्रकरण असुनही पोलीस या प्रकरणाबाबत मौन धारण करून होते.