लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापड विक्रेत्याला तामिळनाडूतील अण्णा टोळीने २४ लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर आपल्या थकीत रकमेची मागणी केली असता त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली. रामसिंग मंगलसिंग सोंधा (वय ३५, माजिसा एजन्सी, गांधीबाग), बाबू ऊर्फ मोहना सुंदरमटी (वय ३२, रा. कुमारण कॉलेजजवळ तिरूपट, तामिळनाडू) आणि रविशंकर सुरमुंगम (वय ३२, रा. मुरगन पुत्तूर, उचम, तामिळनाडू) अशी आरोपींची नावे आहेत.भूपेंद्र रमेशलाल केवलरामानी (वय ४१, रा. साईबसेरा, मिसाळ ले-आऊट) यांचे तहसीलमधील कोलबास्वामी मंदिराजवळ दुकान आहे. ते रेडिमेड सलवार सूटचे वितरक आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये उपरोक्त आरोपींसोबत त्यांचा व्यावसायिक संबंध आला. आमची कंपनी असून, आम्ही सर्वत्र रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करतो, असे सांगून सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत आरोपींनी केवलरामानींकडून २३ लाख, ७४ हजारांचे कपडे नेले. आरोपींनी ते बाजारात विकले. मात्र, त्यातून आलेली रक्कम केवलरामानी यांना दिली नाही. व्यापाऱ्याकडून कपड्याचे पैसे यायचे आहे, असे सांगून आरोपींनी तब्बल नऊ महिने केवलरामानी यांना टाळले. अलिकडे मात्र त्यांनी केवलरामानींना रक्कम देण्याऐवजी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे केवलरामानी यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.
नागपुरात कापड विक्रेत्याला अण्णा टोळीचा गंडा : २४ लाखांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:17 PM
कापड विक्रेत्याला तामिळनाडूतील अण्णा टोळीने २४ लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर आपल्या थकीत रकमेची मागणी केली असता त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली.
ठळक मुद्दे तहसील ठाण्यात गुन्हा दाखल