नागपूर : ‘वन नेशन वन इलेक्शन’वर बोलणारे लोक हरियाणा जम्मू-काश्मीर सोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेत नाहीत. महाराष्ट्रात लवकरात लवकर निवडणुका घोषित झाल्या पाहिजे, अशी मागणी करीत जनता सत्ता परिवर्तन करून महाविकास आघाडीला समर्थन देईल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
नागपुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, भाजपला सत्तेतून हटवणे एवढेच महाविकास आघाडीचे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आता कुठलीही चर्चा होणार नाही. निकालानंतरच महाविकास आघाडी त्या संदर्भात चर्चा करेल. सरकार बनवने एवढेच आमचे उद्दिष्ट आहे. या निवडणुकीत कोणीच लहान भाऊ नाही, मोठा भाऊ नाही. या निवडणुकीत अनेक छोटे पक्ष आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. - महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात तीन चर्चा सुरू आहे. विदर्भ काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसच्या सोबत राहिलेला आहे. यावेळी सुद्धा राहील. लोकसभेतही विदर्भाने साथ दिली. जागावाटपाच्या वेळी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊ, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
तिरुपती मंदिरातील प्रसादाबाबत घडलेला प्रकार गंभीर आहे. लोक श्रद्धने मंदिरात जातात. त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.