लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईश्वर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली, हे सत्य कुणी नाकारू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मानला जातो, एवढी आई या शब्दाची, संकल्पनेची आणि अस्तित्त्वाची महती आहे. या आईचे महात्म्य अधाेरेखित करणारा एक अनाेखा उपक्रम राेकडे ज्वेलर्स आणि लाेकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित करण्यात आला. या ऑनलाइन उपक्रमांतर्गत आयाेजित स्पर्धेतील विजेत्यांची शुक्रवारी घाेषणा करण्यात आली.
या उपक्रमात १८ वर्षांवरील सर्व वयाेगटाच्या महिला सहभागी झाल्या हाेत्या. रोकडे ज्वेलसर्च अधिकृत फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला फॉलो करीत सर्वांनी आपल्या आईसोबतचा फोटो फेसबुक पेजवर शेअर करीत त्यांच्या मित्रांना टॅग केला. ज्या फोटोंना भरपूर लाइक्स मिळतील, त्यांना व सर्वोत्कृष्ट फोटोज म्हणून निवड करण्याची अट हाेती. ९ मे रोजी साजरा होणाऱ्या वर्ल्ड मदर्स डेच्या निमित्ताने राेकडे ज्वेलर्स व लाेकमत सखी मंचच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग हाेऊन आईसाेबतचे फाेटाेज पाठविले. त्यानुसार, आलेल्या एन्ट्रीजमधून सर्वाेत्कृष्ट विजेत्यांची निवड करण्यात आली. काेराेना प्रकाेप लक्षात घेत लावलेल्या टाळेबंदीमुळे अक्षय तृतीया सणाच्या दिवशी अनेकांच्या दागदागिने खरेदी करण्याच्या इच्छेला खीळ बसला. मात्र, शोरूम बंद असले, ती ग्राहकांच्या सेवेत रोकडे ज्वेलर्स सज्ज आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहाराद्वारे ग्राहकांना दालन उघडे करण्यात आले.
अक्षय तृतीया सणाचे निमित्त साधून ऑनलाइन इव्हेंटचे आयाेजन करण्यात आले. राेकडे ज्वेलर्सच्या संचालिका अनामिका राेकडे यांनी या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली हाेती. अनेकांनी पाठविलेल्या फाेटाेजमध्ये सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या सर्वाेत्कृष्ट फाेटाेजची निवड करून स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली. अनामिका यांनी मदर्स डेच्या स्पर्धेतील विजेत्यांच्या नावाची घाेषणा केली. विजेत्या ठरलेल्या सखींना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात काेराेना नियमांचे पालन करून आयाेजित कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
विजेत्या ठरलेल्या सखी
मंगला कारेमोरे- अलका बारई प्रथम
वैशाली आगलावे - रंजना पाटील द्वितीय
श्रद्धा निंबार्ते - कल्पना निंबार्ते तृतीय
शीतल जुमनाके - माला पेंदोर उत्तेजनार्थ
अक्षदा नखाते - शालू तिजारे उत्तेजनार्थ