चौधरी यांच्या हस्ते देवी लक्ष्मीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेस प्रारंभ झाला. यावेळी बँकेचे संचालक स्व. हसमुख सागलानी व अन्य कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या सभासद व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बँकेचा गतवर्षीचा लेखाजोखा व अहवाल सादर करण्यात आला. यासोबतच बँकेच्या गत आर्थिक वर्षातील आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बोर्ड ऑफ मॅनेजमेंट गठित करण्याच्या दृष्टीने उपविधी दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली. यावेळी पुढील आर्थिक वर्षाकरिता डी.एन. टोनपे ॲण्ड कंपनीला वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यात आली. तांत्रिक माहितीचे मार्गदर्शन दिलीप मनघटे यांनी केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास दुरगकर यांनी मानले. यावेळी बँकेचे संचालक यादवराव शिरपुरकर, विजय कडू, मधुकर झलके, गणेश वांढरे, दिलीप माथनकर, गोकुळप्रसाद राठोड, श्याम कापसे, समीर रहाटे, किशोर शिरपूरकर, सूर्यभान रामटेके, शरद छाडी, शंकर भुसारी, सुलोचना खडगी, मृदुल देशमुख, ॲड. अशोक बनसोड, सुरेश गावंडे, हर्षदा ढेरे, योगेश्वर पारशिवनीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज खंडागळे उपस्थित होते.
...........