भिवापूर : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये वार्षिक निरीक्षण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे, उपनिरीक्षक प्रकाश चंगोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
निरीक्षणाच्या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी पोलीस स्टेशन मधील मुद्देमाल कक्ष, लेखा शाखा, क्राईम कक्ष, गोपनीय शाखेची पाहणी करून रेकॉर्डची तपासणी केली. शिवाय पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन व अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी कोरोनावर मात करणारे पोलीस पाटील यशवंत इरदंडे, राकेश गेडाम व सेवानिवृत्त झालेले पोलीस पाटील प्रमोद गारघाटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी राजू सेलोकर, चंद्रकांत रेवतकर, श्रीराम डोईफोडे, दीपक जाधव, गोकुळ सलामे, नरेंद्र पटले, विनोद झाडे, राजन भोयर, भगवानदास यादव, राजेंद्र डहाके, कांती कोकोडे, अनिल कोकोडे, राकेश त्रिपाठी, नरेश बाटबराई, दुर्गा शंभरकर, पूजा इंगळे, मृणाली चाके, निलक्षा नेवारे यांच्यासह तालुक्यातील ४२ गावातील पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
090721\img-20210709-wa0099.jpg
उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील