शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

घातपाताच्या भीतीने ‘एएनओ’ अस्वस्थ

By admin | Published: April 26, 2017 1:28 AM

बॅकफूटवर गेल्याचा बनाव निर्माण करणाऱ्या माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये अचानक आक्रमक होत क्रौर्याची परिसीमा गाठली आहे.

गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडण्याचे संकेत नरेश डोंगरे  नागपूर बॅकफूटवर गेल्याचा बनाव निर्माण करणाऱ्या माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये अचानक आक्रमक होत क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. अवघ्या ४३ दिवसात तीन मोठ्या घातपाती घटना घडवत ३९ जवानांचे बळी घेतले. माओवादी गडचिरोली-गोंदियातही घात लावून बसले आहेत. सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील केशोरीजवळ पुरावाही मिळाला. गेल्या दीड महिन्यात गडचिरोली-गोदिंयात नक्षल्यांनी जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या आहेत. चार महिन्यात पाच निरपराध नागरिकांची हत्या केली असून कोणत्याही क्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचे संकेत आहे. परंतु राज्य सरकार डोळ्यावर झापड लावून बसल्यासारखे वागत आहे. ज्या विभागावर नक्षल्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी आहे, त्या महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी अभियानात (एएनओ) उपमहानिरीक्षकांसह अनेक पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. या संवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या पदाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडून चालवला जात आहे. घातपाताच्या भितीने ‘एएनओ’ अस्वस्थ त्यामुळे सरकार गडचिरोली-गोंदियातही नक्षलवादी हल्ल्याची वाट बघत आहे का, असा संतप्त प्रश्न संबंधित वर्तुळातून विचारला जात आहे. देशातील विविध भागात यापूर्वी घडलेल्या माओवादी हिंसक कारवायाची सूत्रे हलविणाऱ्या प्रा. जी. एन. साईबाबा आणि त्याच्या तीन साथीदारांना गडचिरोली न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्यांना नागपूरच्या कारागृहात डांबले आहे. या घडामोडीने माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. तेव्हापासून माओवादी अचानक आक्रमक झाले आहेत. १३ मार्च २०१७ ला छत्तीसगडमधील भेज्जी (सुकमा जिल्हा) परिसरात माओवाद्यांनी अ‍ॅम्बुश लावून केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) २१९ बटालियनच्या जवानांवर जोरदार हल्ला चढवला. यात १२ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर माओवाद्यांनी सीआरपीएफची अत्याधुनिक शस्त्रे आणि रेडिओ सेटस्ही पळवून नेले होते. त्याचदरम्यान दंतेवाड्यातही दोन जवानांचे बळी घेतले होते. या घटनेला आता केवळ दीड महिना झाला. तोच पुन्हा सोमवारी २४ एप्रिलला याच सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी रक्तपात घडविला. घात लावून २५ जवानांचे बळी घेतले. महाराष्ट्र सरकारने नक्षल चळवळीचे ‘थिंक टँक’ कारागृहात डांबल्याचा सूड उगविण्यासाठी माओवादी घात लावून बसले आहेत. संधी मिळताच मोठा घातपात घडवून आणू शकतात. गोंदिया जिल्ह्यातील केशोरीजवळ सोमवारी रात्री स्फोटके पेरून घातपात घडविण्याचा कट माओवाद्यांनी रचला होता, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे टळला. ही स्फोटके जप्त करण्यात आली. नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या एएनओवर आहे, त्या एएनओत दोन डझनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यात चार पोलीस निरिक्षक आणि डझनभर उपनिरीक्षकांचाही समावेश आहे. छोटी मोठी पदेच काय चक्क एएनओ प्रमुखांचे पदही रिक्त आहे. २०१६ मध्ये या पदावर शिवाजीराव बोडखे हे कार्यरत होते. डिसेंबर २०१६ अखेरीस गृहविभागाने या पदावर एस. शेलार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तशी रीतसर बदली प्रक्रिया झाली. मात्र, शेलार यांनी या बदली आदेशाला धुडकावून लावले. तब्बल महिनाभर वाट बघूनही ते येथे रुजू झाले नाही. त्यामुळे बोडखे यांनी ४ फेब्रुवारीला त्यांच्या नव्या जबाबदारीचा (सहपोलीस आयुक्त नागपूर) पदभार स्वीकारला. तेव्हापासून एएनओ प्रमुखाच्या पदाचा अतिरिक्त प्रभार बोडखे यांच्याकडेच आहे. -- चौकट ((१)) पाच वर्षांतील नक्षली हैदोस गडचिरोली-गोंदियात २०१२ ते २०१७ या गेल्या पाच वर्षांत नक्षली घातपात, चकमकी, हल्ले, जाळपोळ, हत्या, लुटालूट अशा एकूण ११७ घटना घडल्या. नक्षल्यांनी तब्बल ९५ निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या. हल्ले आणि चकमकीत ३६ पोलीस शहीद झाले तर, पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ५७ नक्षलवादीही मारले गेले. छत्तीसगडमधील सुकमाचा थरार देशभर चर्चेला आला असताना महाराष्ट्रात छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या केशोरी (जि. गोंदिया) पोलीस ठाण्याच्या भागातील जंगली रस्त्यात नक्षल्यांनी शक्तिशाली स्फोटके दडवून ठेवली होती. या भागात सुरक्षा मोहिमेवर असलेल्या जवानांना वाहनांसहित उडवून देण्याचा नक्षल्यांचा कट होता. मात्र, सतर्क जवानांच्या लक्षात नक्षल्यांचा कट आला. त्यामुळे लगेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तेथून ती स्फोटके बाहेर काढली आणि नष्ट केली. जंगलात गरज नाही तरीसुद्धा ! विशेष म्हणजे, ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीतच नव्हे तर नेहमीच तात्काळ निर्णय घेण्यासाठी एएनओच्या प्रमुखाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. असे असताना एएनओचे कार्यालय नागपुरात आहे. त्यामुळे एएनओ प्रमुखांना रोज गडचिरोली गोंदियाच्या घनदाट जंगलातही जाण्याची गरज नसते, फार तर महिन्यातून दोन ते तीन वेळा तेथे एएनओ प्रमुख जातात. एएनओच्या दिमतीला अनेकदा हेलिकॉप्टरही असते. असे असताना देखील शेलार येथे रुजू झाले नाही आणि नंतर दुसऱ्या कोणत्या अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करण्याची सरकारलाही गरज वाटली नाही. दरम्यानच्या काळात थिंक टँकच्या समर्थनार्थ फ्रंट आॅर्गनायझेशनच्या देशभरातील सदस्यांची नागपूरच्या आमदार निवासात बैठक पार पडली. तरीसुद्धा सारे काही आलबेल असल्यासारखी भूमिका सरकारने घेतल्यामुळे सरकार गडचिरोली-गोंदियात माओवादी हल्ल्याची वाट बघत आहे की काय, असा संतप्त प्रश्न संबंधित वर्तुळातून उपस्थित झाला आहे.