शहरं
Join us  
Trending Stories
1
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
2
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
3
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
4
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
5
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
6
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
7
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
8
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
9
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
10
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
11
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
12
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
13
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
14
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
15
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
16
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
17
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
18
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
19
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
20
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?

नागपुरात आणखी ३८ पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या २६८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 11:42 PM

२४ तासात १०६ रुग्ण नव्या ३८ रुग्णांची नोंद, दोन कोरोनामुक्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी ...

२४ तासात १०६ रुग्णनव्या ३८ रुग्णांची नोंद, दोन कोरोनामुक्तलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८वर पोहचली आहे. यात तीन मृत्यूंची नोंद आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६५ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दिवसा ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर रात्री मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली. एकाच दिवशी ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २३०वर पोहचली होती. आज गुरुवारी मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २२, नीरीच्या प्रयोगशाळेतून सहा, मेयोच्या प्रयोगशाळेतून सात व माफसुच्या प्रयोगशाळेतून तीन असे एकूण ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या दोन दिवसांत १०६ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. त्यानंतर शंभराव्या रुग्णाची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. पहिले शंभर रुग्ण गाठायला ४४ दिवस लागले. मात्र २५ एप्रिल ते सहा मे या १३ दिवसांत दुसºया शंभर रुग्णांची नोंद झाली. यावरून रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुढील काही दिवस नागपूरकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण हे मोमिनपुरा व सतरंजीपुºयातील आहेत. हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणातील आहेत.सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेला रुग्ण. याला वैद्यकीय भाषेत ‘ सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणतात. या आजाराचे तीन रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आज या तिन्ही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेने कमी असल्याने ‘हायरिस्क’ रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जाते.सर्वाधिक रुग्ण मोमिनपुºयातीलमिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या ३८ रुग्णांमध्ये मेडिकलमधील १९, मेयोतील सात तर माफसुमधील तीन असे एकूण ६० रुग्ण आहेत. केवळ नीरी येथील सहा रुग्ण हे सतरंजीपुºयातील आहेत. पार्वतीनगर येथील कोरोनाबाधित मृताच्या नातेवाईकांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.दोन रुग्ण कोरोनामुक्तमोमिनपुरा येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा नमुना १४ दिवसांनंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना मेयो रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ एप्रिल रोजी त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू होते. मेडिकलमधीलही एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २१५दैनिक तपासणी नमुने १८०दैनिक निगेटिव्ह नमुने ११३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २६८नागपुरातील मृत्यू ०३डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६५डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,५८६क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,०८९पीडित-२६८-दुरुस्त-६५-मृत्यू-३ 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर