शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

नागपुरात आणखी ४० ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:55 PM

शहरातील कोविडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी यापूर्वी ६२ खासगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे.

ठळक मुद्देआयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्त्वपूर्ण निर्णय : १०२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोविडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी यापूर्वी ६२ खासगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे. शहरात १०२ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार केले जातील. रुग्णहिताच्या दृष्टीने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले.शहरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात. मात्र शहरातील वाढती स्थिती लक्षात घेता त्यानंतर काही खासगी रुग्णालयांना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. शहरातील वाढते संक्रमण लक्षात घेता आयुक्तांनी पुन्हा ४० रुग्णालयांचा यात समावेश केला.४८ तासांमध्ये कोविड रुग्णांवर उपचारसध्या ४० रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. इतर रुग्णालयांमध्ये लवकरच उपचार सुरू केले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली आहे. या रुग्णालयांमध्ये येत्या ४८ तासांमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण भरती करण्यात येतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू करून रुग्णाचा रिअल टाईम डाटा मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्ययावत करणे रुग्णालय प्रशासनाला अनिवार्य राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.नवे ४० डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलपरफेक्ट हेल्थ सुपर मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल धंतोली, न्यूक्लिअस मदर अ‍ॅण्ड चाईल्ड मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, नेल्सन मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल सक्करदरा, श्रीकृष्ण हृदयालय अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.के.जी.देशपांडे मेमोरिअल सेंटर फॉर ओपन हार्ट सर्जरी, मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल उंटखाना रोड, सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, बोरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, तामसकर क्लिनिक रामदासपेठ, लोटस हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अ‍ॅण्ड मॅटर्निटी होम, सफल हॉस्पिटल काँग्रेस नगर, प्रेस्टिज हॉस्पिटल छावणी, जी.टी. पडोळे हॉस्पिटल, खलाटकर हॉस्पिटल रेशीमबाग, श्रावण हॉस्पिटल अ‍ॅण्ड किडनी इन्स्टिट्यूट, रहाटे सर्र्जिकल हॉस्पिटल, ग्रीन सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड नर्सिंग होम, मुखर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आरएनएच हॉस्पिटल प्रा.लि., आदित्य हॉस्पिटल क्रिटिकल केअर अ‍ॅण्ड इमर्जन्सी सेंटर, खोब्रागडे चाईल्ड ट्रस्ट हॉस्पिटल अ‍ॅण्ड इन्टेन्सिव्ह केअर इन्स्टिट्यूट, आरोग्यम सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल शिवाजी नगर, तारांगण सर्जिकल हॉस्पिटल, सुपरलाईफ हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, एलिक्झिर मेट्रो सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर, अभियोग स्पाईन अ‍ॅण्ड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अँड मॅटर्निटी होम, कुबडे हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, जेनक्यूअर हॉस्पिटल, एस.एस. मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, गार्सियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मेट्रो हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटल, आपुलकी वैरागडे हॉस्पिटल, शांती मोहन हॉस्पिटल, स्वस्तिक क्रिटिकल केअर, इंद्रायणी स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रेस हॉस्पिटल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.