सुरभी शिरपूरकर
नागपूर : या दृश्यांमध्ये तुम्ही एक अपघात बघताय एक ट्रक दिसतोय आणि त्याच्या अगदीच बाजूला खाली पडलेले सिलिंडर दिसतायेत. हा अपघात घडला आहे समृद्धी महामार्गावर.. आता नेमकं घडलं काय ते ऐका, गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक नागपूर ते शिर्डीच्या दिशेने निघाला होता. महामार्गावरील भव्य असे रस्ते पाहून ट्रक चालकाचाही मोह आवरला नाही. दरम्यान, वाऱ्याच्या वेगाने ट्रक चालविताना त्याचं अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि पाहता पाहता ट्रक रस्त्याच्या कडेला खाली जाऊन उलटला.
बुलढाणाजवळील मेहकर बेलगाव येथील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही दुर्घटना आहे. गॅस सिलिंडरने भरलेला हा ट्रक होता त्यामुळे ट्रक पालटल्यावर कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकली असती, सिलिंडरचा स्फोट होऊ शकला असता आणि त्यात मोठ नुकसान होऊ शकलं असतं. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अपघातांची मालिका
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला ज्यात एका मर्सिडीज ला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच बुलढाण्यातील ही दुसरी घटना घडलीये.
वाहने चालवा जरा जपून
समृद्धी महामार्गाचे रस्ते पाहून वाहने सुसाट वेगाने चालविल्या जात आहेत. मात्र यामुळे चालकाचे वाहनाच्या स्पीडवरील कंट्रोल सुटतंय आणि त्यामुळे या महामार्गावर अपघातांना सुरुवात झाली आहे. अशातच प्रत्येक चालकाने सावधानीपूर्वक आणि वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालविण्याचे आवाहन लोकमतने केलयं.