ठळक मुद्देआधी निगेटिव्ह रिपोर्ट नंतर तपासले असता पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या यवतमाळातील ७ कोरोना संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाचा अहवाल सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळातून ९ संशयित रुग्ण मागील आठवड्यात मेयोत दाखल झाले होते. त्यापैकी दोघांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. उरलेल्या सात जणांना घरी परत पाठवले होते. या सातपैकी एकाला घरी गेल्यानंतर पुन्हा खोकला-तापाचा त्रास सुरू झाल्याने त्याला पुन्हा मेयोत पाठवण्यात आले. या रुग्णाचा आता आलेला अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण काही दिवसांपूर्वी दुबईहून यवतमाळात आला असल्याचे कळते. विदर्भात नागपूरमध्ये ४ तर यवतमाळमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.