शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

एकाच्या बदलीवर दुसऱ्याचा आक्षेप! जिल्हा परिषदेत समुपदेशनाने सर्वसाधारण बदल्या

By गणेश हुड | Published: May 11, 2023 7:42 PM

गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  जिल्हा परिषदेत  सर्वसाधारण बदल्याची प्रक्रीया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे. तर काही प्रकरणात कर्मचारी संघटनेच्या वतीनेही आक्षेप नोंदविण्यात आले. अशा प्रकरणात  आलेल्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात बसत असेल तरच बदली करण्याची भूमिका  जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा  यांनी घेतली आहे. 

 गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. पहिल्या दिवशी मंगळचारी  आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक महिला , औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष , आरोग्य सहाय्यक पुरुष , आरोग्य पर्यवेक्षक  आरोग्य सहाय्यक महिला तर शिक्षण विभागांतर्गत केंद्रप्रमुख, कनिष्ठ व्याख्याता,  विस्तार अधिकारी शिक्षण अशा ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

गुरुवारी सात विभागातील समुपदेशनाने बदल्या  करण्यात आल्या.  त्यामध्ये वित्त विभागावातील सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी, आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी यांचा समावेश होता तर लघु पाटबंधारे विभाग यामध्ये शाखा अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदींचा समावेश होता. 

 तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता या सोबतच बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अभियांत्रिकी सहाय्यक यांची बदली करण्यात आली यानंतर पशुसंवर्धन विभागांतर्गत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,  पशुधन पर्यवेक्षक ,पट्टीबंधक यांच्या तर महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत पर्यवेक्षिका पदाच्या बदल्या  करण्यात आल्या . कृषी विभागांतर्गत विस्तार अधिकारी कृषी यांची बदली समुपदेशनाने करण्यात आली  एकूण२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी,विस्तार   अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक या पदांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या .समुपदेश प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडडे, उपाध्यक्ष  कुंदा राऊत,  मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या  शर्मा, सभापती राजकुमार कसबे  तसेच सामान्य प्रशासन  विभागाचे विभाग प्रमुख विपुल जाधव  आदींच्या उपस्थितीत ही प्रक्रीया सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर