लोकमत न्यूज नेटवर्कफहीम खाननागपूर: दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. प्रेमीयुगुले वर्षभर या आठवड्याची वाट पाहत असतात. मागील काही वर्षांपासून नागपुरात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु केवळ १४ फेब्रुवारीनंतरच प्रेमी जोड्यांचे सेलिब्रेशन थांबते असे नाही. तर १५ फेब्रुवारीपासून अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकदेखील सुरू होतो. याचे प्रमाणही वेगाने वाढते आहे.व्हॅलेंटाईन वीक अंतर्गत जसे रोझ डे, प्रपोज डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, चॉकलेट डे, किस डे असतात तसेच या अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकमध्येही वेगवेगळे दिवस असतात. पाश्चात्त्य देशात याचे मोठे आयोजन असते. अशा या अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकचे वेगवेगळे दिवसही फार मजेशीर आहेत. त्यात १५ फेब्रुवारी हा स्लॅप डे, १६ फेब्रुवारी किक डे, १७ फेब्रुवारी परफ्युम डे, १८ फेब्रुवारी फ्लर्टिंग डे, १९ फेब्रुवारी कन्फेशन डे, २० फेब्रुवारी मिसिंग डे आणि २१ ला ब्रेकअप डे साजरा केला जात असतो.
उद्यापासून साजरा करा अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:41 AM