मेहा शर्मा
नागपूर : काेराेना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे लक्षण नसलेले रुग्ण हाेत. हे खरे सुपरस्प्रेडर आहेत. अनेकदा पाॅझिटिव्ह असल्याचे त्यांना समजतच नाही आणि ते संसर्ग वाढवत असतात. अनेकदा त्यांची आरटी-पीसीआर टेस्टही निगेटिव्ह असते. अशावेळी एकमेव पर्याय म्हणजे ॲन्टिबाॅडी टेस्ट करणे हाच आहे. ॲन्टिबाॅडी टेस्टचे आयजीएम व आयजीजी असे दाेन प्रकार आहेत. या सर्व बाबींवर लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून ॲन्टिबाॅडी टेस्टबाबत सविस्तर माहिती घेतली.
काॅर्डियाेलाॅजिस्ट डाॅ. एच.एम. मार्डीकर यांच्या मते हर्ड इम्युनिटीबाबत विचार करताना आयजीजी प्रकारची ॲन्टिबाॅडी टेस्ट करण्यात येते. ॲन्टिबाॅडी टेस्टमध्ये न्युक्लिओकॅप्सिड आणि आरबीडी ॲन्टिबाॅडीची तपासणी केली जाते. मात्र काेणती टेस्ट करण्यास सांगणे, ही बाब डाॅक्टरांवर अवलंबून आहे. कुणी कम्बाइन आरबीडी व न्युक्लिओकॅप्सिड तर कुणी केवळ आरबीडी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. दाेन्ही चाचण्या विषाणूपासून सुरक्षा देण्यास उपयाेगी आहेत.
ॲन्टिबाॅडी टेस्ट आणि लसीकरणानंतर करण्यात येणाऱ्या टेस्टबाबत काॅर्डियाेलाॅजिस्ट डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी सांगितले. ॲन्टिबाॅडी म्हणजे ब्लड प्राेटीन असतात जे आपल्याला सुरक्षा प्रदान करतात. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर माणसाची राेग प्रतिकारशक्ती ॲन्टिबाॅडीची निर्मिती करते. आपल्या शरीरात जेवढ्या अधिक प्रमाणात ॲन्टिबाॅडी असतील तेवढे आपण वारंवार हाेणाऱ्या संक्रमणापासून वाचू शकताे. लसीमुळे आपल्या शरीरात ॲन्टिबाॅडी तयार हाेतात, ज्यामुळे संक्रमण राेखले जाऊ शकते. आयजीजी ॲन्टिबाॅडी काेराेना संक्रमण झाल्यानंतर किंवा लसीकरणाच्या दाेन आठवड्यानंतर शरीरात दिसून येते, जी अनेक महिने कायम राहते. साधारणपणे आयजीजी आणि आयजीएमची नियमित ॲन्टिबाॅडी टेस्ट करवली जाते. मात्र लसीकरणानंतर ॲन्टिबाॅडी टेस्ट करणे आवश्यक नसल्याचे मत डाॅ. अर्नेजा यांनी व्यक्त केले.
कन्सल्टंट इंटेन्सिविस्ट डाॅ. उत्कर्ष शाह यांनी सांगितले, टाेटल आणि क्वांटिटेटिव्ह हे दाेन प्रकारचे काेविड बाॅडी एकूणच ॲन्टिबाॅडीची गणना करतात. यामुळे शरीरात ॲन्टिबाॅडी आहेत की नाही, याची माहिती मिळते. उल्लेखनीय म्हणजे निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतरही काेराेनाचे संक्रमण झाले नसल्याचे ठामपणे सांगता येत नाही. क्वांटिटेटिव्ह ॲन्टिबाॅडी प्रकारात टिटरे स्पाइक एस प्राेटीन आरबीडीच्या आधारावर ॲन्टिबाॅडीची गणना केली जाते. याचा स्तर लसीकरणानंतर किंवा काेराेना संक्रमणानंतर वाढते. यामध्ये आयजीएम व आयजीजी या दाेन्हींचा समावेश आहे. यामध्ये रक्तातील ॲन्टिबाॅडीची अचूक माहिती मिळते. मात्र काेराेना संक्रमणादरम्यान घेतलेल्या रक्त नमुन्यांच्या तपासणीचा रिपाेर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टेस्ट ॲक्यूट इन्फेक्शनच्या प्रकरणात करणे याेग्य नाही. उल्लेखनीय म्हणजे ॲक्यूट इन्फेक्शनची माहिती करण्यास दाेन्ही टेस्ट उपयाेगी नाही. ॲन्टिबाॅडी टिटरेचा काेणता स्तर सुरक्षित आहे, याबाबतचा डेटा अद्याप समाेर आलेला नाही.