शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

ग्वालबन्सीच्या साथीदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Published: May 10, 2017 2:36 AM

एका निवृत्त फौजदाराचा हजारीपहाड येथील भूखंड हडपून त्यांना खंडणीची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी भूखंड माफिया हरीश ग्वालबन्सी याच्या एका साथीदाराचा

निवृत्त फौजदाराचा भूखंड हडपून दिली होती धमकी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका निवृत्त फौजदाराचा हजारीपहाड येथील भूखंड हडपून त्यांना खंडणीची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी भूखंड माफिया हरीश ग्वालबन्सी याच्या एका साथीदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अलोक अशोक महादुले (३४) रा. गिट्टीखदान असे आरोपीचे नाव असून, तो नर्मदा को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष आहे. त्याचे कडबी चौक येथे डायेट शाक नावाचे रेस्टॉरंट आहे. बाबाराव वामनराव ढोमणे (६१) रा. पोलीस मुख्यालय, असे निवृत्त फिर्यादी फौजदाराचे नाव आहे. प्रकरण असे, हजारीपहाड येथील नर्मदा को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा खसरा नं. ७/१, ७/३ मधील ७१ क्रमांकाचा भूखंड १९९० मध्ये बयनाबाई साहेबराव तायडे यांनी रजिस्ट्री खरेदीखत करून विकत घेतला होता. पुढे बयनाबाई तायडे यांनी २००२ मध्ये हा भूखंड बाबाराव ढोमणे यांची पत्नी उषाबाई बाबाराव ढोमणे यांना रजिस्टर्ड विक्रीपत्रान्वये विकला. खुद्द फिर्यादी बाबाराव ढोमणे हे तीन आठवड्यापूर्वी आणि २७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हजारीपहाड येथील आपल्या भूखंडावर गेले होते. हरीश ग्वालबन्शी, शैलेश ग्वालबन्शी, अलोक महादुले आणि त्यांच्या १५-२० साथीदारांनी त्यांचा रस्ता अडवून आम्ही ही जमीन घेतली आहे. तू परत प्लॉटवर आला तर हातपाय तोडीन, अशी धमकी दिली होती. त्यांच्या सोबतच्या लोकांनी शिवीगाळ केली होती. शैलेश ग्वालबन्शी याने धक्काबुक्की करून त्यांना हाकलून लावले होते. हरीश ग्वालबन्शी याने तुला प्लॉट हवा असेल तर आम्हाला सात लाख रुपये दे, नाही तर परत प्लॉटवर यायचे नाही, असे म्हणून धमकी दिली होती. प्लॉट ६३ चे मालक प्रमोद अहिरे यांच्या फोनवर फोन करून हरीश ग्वालबन्सी याने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली होती. बाबाराव ढोमणे यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात २९ एप्रिल २०१७ रोजी भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३८४, ३८७, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अलोक महादुले याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले.