शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

अनुजचे देश रक्षणाचे स्वप्न हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:10 AM

अरुण महाजन लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : पावसाची रिपरिप सुरू असतानाच खेळाडू नेहमीप्रमाणे चनकापूर (ता. सावनेर) येथील मैदानावर फुटबाॅल ...

अरुण महाजन

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : पावसाची रिपरिप सुरू असतानाच खेळाडू नेहमीप्रमाणे चनकापूर (ता. सावनेर) येथील मैदानावर फुटबाॅल खेळत हाेते. कुणाच्या ध्यानीमनी नसताना जाेरात कडाडलेली वीज थेट अंगावर काेसळली आणि त्यात अनुज कुशवाह (२३), तन्मय दहीकर (१२) दाेघेही रा. चनकापूर काॅलनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अकाली मृत्यू ओढवल्याने अनुजचे सैन्यात दाखल हाेऊन देश रक्षणाचे स्वप्न मात्र नियतीने हिरावून घेतले.

अनुज अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी हाेता. सैन्यात दाखल हाेणे व देशसेवा करणे ही महत्त्वाकांक्षा त्याने बालपणापासून जाेपासली आणि त्या दिशेने वाटचालही सुरू केली. यातूनच त्याने पदवीसाठी अभियांत्रिकी शाखा निवडली हाेती. सैन्यात फिजिकल फिटनेसला विशेष महत्त्व असते. त्यामुळे ताे राेज चनकापूर येथील मैदानावर सराव करायचा. वैभव सरोदे, पंकज प्रसाद व संजीव मिश्रा हे अनुजचे जीवलग मित्र हाेय. घटनेच्यावेळी पंकज व संजीव त्याच्यासाेबत मैदानावर नव्हते. वैभवने मात्र हा संपूर्ण दुर्दैवी घटनाक्रम बघितला.

तन्मय दहीकर हा अवघ्या १२ वर्षांचा. त्याला अनुराग (१५) हा थाेरला भाऊ व वर्षाताई (४५) या आई आहे. घटनेच्यावेळी अनुराग तन्मयसाेबत याच मैदानावर फुटबाॅल खेळत हाेता. खेळताना ताे तन्मयपासून थोड्या अंतरावर होता. वीज काेसळताच डाेळे मिटले व डाेळ्यासमाेर अंधार झाला. डाेळे उघडताच तन्मय गंभीर जखमी झाल्याचे त्याला दिसले आणि पायाखालची जमीन सरकली. अनुरागला बघताच तन्मयने डाेळे मिटले. तन्मयला रुग्णालयात नेत असताना अनुराग घरी परत आला. या घटनेमुळे अनुरागला जबर मानसिक धक्का बसला आहे. तहसीलदार सतीश मसाळ, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी, सरपंच पवन धुर्वे, उपसरपंच रिंकू सिंग, तलाठी मनोज रामटेके यांनी अनुज व तन्मयच्या घरी जाऊन कुटुंबीयांना सांत्वना दिली.

...

दाेघे भाऊ आधारस्तंभ

अनुजला दाेन भाऊ असून, दाेघेही त्याच्यापेक्षा माेठे आहेत. आपण सैन्यात वीरमरण जरी आले तरी दाेघे भाऊ आईवडिलांचे आधारस्तंभ म्हणून राहतील, असे ताे नेहमीच त्याच्या मित्रांशी बाेलायचा. त्याचे वडील वेकाेलिच्या पाटणसावंगी (ता. सावनेर) खाणीत नाेकरीला हाेते. अनुज उमदा, माेकळ्या व बाेलक्या स्वभावाचा हाेता. त्याचा आम्हा सर्वांना अभिमान हाेता, असेही त्याच्या वैभव सरोदे, पंकज प्रसाद व संजीव मिश्रा या मित्रांनी सांगितले.

...

वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन

तन्मयच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या घटनेमुळे अनुरागसाेबतच त्याच्या आईलाही जबर मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच आई भाेवळ येऊन काेसळली हाेती. अनुराग व त्याच्या आईला वलनी येथील रुग्णालयात भरती केले आहे. तन्मयच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी काेराेनामुळे निधन झाले. घरातील कमावती व्यक्ती गेल्याने सर्व जबाबदारी आईवर आली हाेती. आता नियतीने धाकट्या मुलाला हिरावून नेले.