लोकमत न्यूज नेटवर्ककोराडी : महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ, महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, नागपूर सुधार प्रन्यास व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. जागतिक पर्यटनदिनी प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर भक्तिसंगीताची भाविकांसाठी मेजवानी ठरली. यावेळी सुमारे १० हजार श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवून भक्तिगीतांचा मनमुराद आनंद लुटला.महोत्सवाच्या चतुर्थ पुष्पाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. अनुराधा पौडवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीला आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, ज्योती बावनकुळे, बापू बावनकुळे, रामदास आंबटकर, संस्थानचे सचिव केशव फुलझेले, विश्वस्त प्रेमलाल पटेल, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, महादुल्याच्या नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, रामदास महाराज, हनुमंत हेडे, अरुण सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या आठ हजार प्रेक्षकक्षमतेचा शामियाना तब्बल १० हजार श्रोत्यांनी खचाखच भरला होता. व्हीआयपी, व्हीव्हीआयपीसह सर्व आसनव्यवस्था फुल्ल झाल्यावर आयोजकांना वेळेवर अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. कार्यक्रमस्थळी तिन्ही बाजूने मोठ्या संख्येत भाविक उभे होते. अक्षरश: भक्तांचा महासागर लोटला होता.नागपूरकरांची मने जिंकली : चंद्रशेखर बावनकुळेअनुराधा पौडवाल यांच्या भक्तिसंध्येला आलेला हा मोठा जनसमुदाय नागपूरकरांच्या प्रेमाची ग्वाही देत असून पौडवाल यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. दोन वर्षांचा हा कोराडी महोत्सव भविष्यात असाच बहरत जाणार आहे. सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा, संस्कृती जतनासाठी अशा महोत्सवांची गरज आहे. या महोत्सवाला आर्थिक सहकार्य करणारे, आयोजनासाठी मेहनत घेणारे सर्व अधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक खºया अर्थाने अभिनंदनास पात्र असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.यासोबतच विजय दर्डा यांनी अभ्यंकरनगर येथील अभ्यंकरनगर दुर्गा उत्सव मंडळाला भेट देत दुर्गादेवीचे दर्शन घेतले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर रामदासपेठ प्लॉट ओनर्स अॅण्ड रेसिडेंट असोसिएशनच्यावतीने आयोजित रासगरबा उत्सवातही ते सहभागी झाले.
अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिसंगीताची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:49 AM
महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ, महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, नागपूर सुधार प्रन्यास व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची बुधवारी सांगता झाली.
ठळक मुद्देकोराडी पर्यटन महोत्सवाची सांगता : हजारो भाविकांनी लुटला आनंद