नागपूर : पक्षप्रवेश संदर्भात महायुतीचे धोरण ठरले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाला अडचणीचे ठरणार नाही, ते पाहूनच निर्णय होईल, पक्षप्रवेशाचा निर्णय रस्त्यावर चर्चा करून होणार नाही किंवा मीडियामध्ये बोलून होणार नाही तर महायुतीच्या व्यासपीठावर चर्चा करूनच होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पस्ट केले.
शिंदे सेनेचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काल दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याबद्दलचे वक्तव्य केले. त्यासंदर्भांत बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पस्ट केली. तसेच असे वक्तव्य रस्तावर चर्चा करून होणार नाही, असेही सांगितले.
सोनिया गांधींनी ज्याप्रमाणे महिला आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान केला ते योग्य नाही,काँग्रेसने कधीच आदिवासी,दलित राष्ट्रपती बनवला नाही. आदिवासी समाज नाराज आहे,आम्ही राष्ट्रपतींच्या मागे ठामपणे उभे आहोत, असेही ते म्हणाले.