लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साठी गाठलेल्या एका रुग्णाच्या हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम झाली. परिणामी, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. सोबतच रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामे होण्यास सुरुवात झाली. ‘एओर्टिक डिसेक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारात शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. परंतु या शस्त्रक्रियेत ९९ टक्के रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यात २४ तासात तातडीने शस्त्रक्रिया करणेही आवश्यक होते. त्यामुळे आधीच या शस्त्रक्रियेला पाच मोठ्या हृदय शल्यचिकित्सकांनी नाकारले होते. अखेर हे आवाहन पेलले डॉ. समित पाठक यांनी. आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी रुग्णाला जीवनदान दिले.अमरावती येथील एका ६० वर्षीय रुग्णाला छातीत दुखायला लागल्याने आणि प्रचंड घाम आल्याने नातेवाईकांनी स्थानिक इस्पितळात भरती केले. प्राथमिक तपासणीनंतर महाधमनी (हृदयातून उगम पावणारी सर्वात मोठी धमनी, जी शुद्ध रक्त शरीराकडे पोहचविते) त्यात मोठा अडथळा आल्याचे निदान झाले. याला इंग्रजीत ‘अॅक्युट एओर्टिक डिसेक्शन’ असे म्हणतात. त्या सोबतच हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम असल्याचे निदान झाले. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे अर्धांगवायूची लक्षणेही दिसू लागली. त्यामुळे रुग्णाला तातडीने नागपुरात हलविले. परंतु नागपुरातील पाच हृदय शल्यचिकित्सकांनी रुग्णाची परिस्थिती फार गंभीर असल्याने व क्लिष्ट शल्यचिकित्सेमुळे उपचार करण्यास नकार दिला. शेवटी वोक्हार्ट हॉस्पिटल येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. समित पाठक यांनी हे आव्हान स्वीकारले. पॉलिस्टर धमनीचे रोपणडॉ. पाठक म्हणाले, रुग्णाच्या नातेवाईकांना जोखमीची माहिती देऊन शस्त्रक्रियेला सुरुवात केली. रुग्णाच्या हृदयाच्या झडपेचे कार्य थांबल्याने कृत्रिम झडप आणि महाधमनीचे उगमस्थान बदलवून त्या ऐवजी पॉलिस्टरची धमनी रोपन केले. यामुळे रक्तपुरवठा सुरळीत झाला. परंतु टिश्यु कमजोर असल्याने टाके लावण्याचे आव्हान होते. रक्तस्रावामुळे रुग्णाची छाती खुली ठेवण्यात आली होती. दुसºया दिवशी टाके लावत छाती बंद करण्यात आली. मूत्रपिंडाचे कार्यही सुरळीत झाले. तीन दिवसाच्या उपचारानंतर रुग्ण चौथ्या दिवशी चालू लागला, हे या शस्त्रक्रियेचे यश होते. ही शस्त्रक्रिया डॉ. समित पाठक, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अवंतिका, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन, डॉ. शिंदे, डॉ. रिता यांच्यासह जिजो, शिनो आणि शुभांगी यांनी यशस्वी केली.
नागपुरात ‘एओर्टिक डिसेक्शन’ दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:44 PM
साठी गाठलेल्या एका रुग्णाच्या हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम झाली. परिणामी, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. सोबतच रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामे होण्यास सुरुवात झाली. ‘एओर्टिक डिसेक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारात शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. परंतु या शस्त्रक्रियेत ९९ टक्के रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यात २४ तासात तातडीने शस्त्रक्रिया करणेही आवश्यक होते. त्यामुळे आधीच या शस्त्रक्रियेला पाच मोठ्या हृदय शल्यचिकित्सकांनी नाकारले होते. अखेर हे आवाहन पेलले डॉ. समित पाठक यांनी. आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी रुग्णाला जीवनदान दिले.
ठळक मुद्दे२४ तासात रुग्णाला मिळाले जीवनदान : कृत्रिम झडपेचे व धमनीचेही रोपण