लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसला वर्षाला ८० ते ९० कोटींचा तोटा आहे. प्रशासन तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणार आहे. तिकिटांचा काळाबाजार झाल्यास यासाठी दिल्ली इन्टिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टिम लिमिटेड (डीआयएमटीएस) ला जबाबदार धरले जाईल. तसेच तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी बसमध्ये सेन्सर सिस्टिम लावणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिली.कंडक्टर संघटितपणे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यातील दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस विभागाला पत्र दिले होते. परंतु अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आपली बससाठी कंडक्टरची नियुक्ती करण्याची जबाबदारी डीआयएमटीएस कंपनीची असल्याने तिकिटांचा काळाबाजार होत असल्यास या कंपनीला जबाबदार धरले जाईल.तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. सेन्सर सिस्टिमच्या माध्यमातून बसमधील प्रवाशांची संख्या नोंद होईल. मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून याचे नियंत्रण केले जाईल तसेच अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती बांगर यांनी दिली.शहरातील बस वाहतूक मेट्रो रेल्वेशी जोडली जाईल. त्यानुसार समन्वय साधला जाईल. यासाठी फीडर सर्व्हिसवर भर दिला जाणार आहे. प्रवाशांची संख्या कमी असलेल्या मार्गावर मिनी बसेस चालविल्या जात आहेत. प्रवासी संख्येचा विचार करून बसेस सोडण्याचे नियोजन के ले जाणार आहे.बसेस सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणारपर्यावरणपूरक सीएनजी व इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासन निधीतून पाच इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत. सर्व बसेस टप्प्याटप्प्याने सीएनजीवर चालविण्याचे नियोजन आहे; सोबतच इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे.फूड वेस्टपासून सीएनजीशहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात ५० मेट्रिक टन फूड वेस्ट असते. यापासून सीएनजी निर्माण केले जाणार आहे. यावर शहर बसेस धावतील. यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल; सोबतच शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागण्यालाही मदत होईल, असा विश्वास अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.
आपली बसमध्ये लागणार सेन्सर सिस्टिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:13 PM
तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी बसमध्ये सेन्सर सिस्टिम लावणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिली.
ठळक मुद्देतिकिटाच्या काळाबाजारासाठी ऑपरेटला जबाबदार धरणारआपली बसला वर्षाला ९० कोटींचा तोटा