शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

विकास कामांवरील स्थगितीमुळे आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी सामाजिक संस्थांना आवाहन

By गणेश हुड | Published: March 09, 2023 7:57 PM

जि.प.च्या आरोग्य समितीचा निर्णय : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम, दुरुस्ती ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या कमी आहे. त्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २८ केंद्राची दुरुस्ती वा नवीन बांधकामाची गरज आहे. परंतु शासनाने विकास कामांना स्थगिती दिल्याने निधी अभावी ही कामे ठप्प आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याने आरोग्य केंद्रांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जि.प.च्या आरोग्य समितीने केले आहे.

मोवाड येथे महापूर आला असताना लोकमत समुहाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जिल्हयातील प्रतिष्ठित संस्था, सेवाभावी संस्थाकडून आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन करण्याबाबतचा निर्णय गुरुवारी आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समितीच्या सभापती व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी दिली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ५८ अॅलोपॅथी व आयुर्वेदिक रुग्णालये आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या ३० लाख आहे. याचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. दुसरीकडे २८ आरोग्य केंद्रांच्या इमारती नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात गळती लागते. रुग्णावर उपचार करता येत नाही. आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी ७ कोटी ६५ लाखांच्या खर्चाला मंजुरी आहे. जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र स्थगितीमुळे हा निधी अप्राप्त आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपलब्ध झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. याचा विचार करता प्रतिष्ठित संस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला.५४ उपकेंद्रांची दुरुस्ती ठप्प

जिल्हयातील ३१६ आरोग्य उपकेंद्रापैकी ५३ उपकेंद्रांच्या इमारती नादुरुस्त आहेत. पावसाळ्यात छताचे पाणी गळते, तर कुठे ओटीची व्यवस्था नाही. इमारती धोकादायक झाल्या आहेत. दुरुस्तीची तातडीची गरज आहे. नादुरूस्त इमारतीमुळे काही उपकेंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही शासनाने निधी रोखला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवा करूनही निधी मिळत नसल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.जि.प.मुख्यालयात आरोग्य कक्ष

जिल्हा परिषद मुख्यालयात ग्रामीण भागातून येणारे नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना वेळप्रसंगी उपचाराची गरज भासते. याचा विचार करता येथे आरोग्य कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील.

नवीन बांधकाम रखडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र

- मांढळ-अडेगाव-येनवा-नगरधन-तिष्टी-नवेगाव खैरी-हिवराबाजारनवीन बांधकाम रखडलेले आरोग्य उपकेंद्र-खरसोली-येणीकाणी-धामणगाव-मौदा-खुबाळा-खापरखेडा-उबाळी-उपरवाही-कांद्री

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्य