लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रात मतदानासाठी ४३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात रामटेक मतदारसंघात २३४५ तर नागपूर मतदारसंघात २०३७ मतदार केंद्रे आहेत. यापैकी ८२ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात ५२ केंद्रे शहरात तर ३० केंद्रे रामटेक लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.
असा आहे कार्यक्रम१८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात२५ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख२६ मार्चला अर्जाची छाननी२८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल११ एप्रिलला मतदान२३ मे रोजी मतमोजणी
निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारीनागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे नागपूर लोकसभा तर अतिरिक्ति जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे रामटेक लोकसभा निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. यासोबतच प्रत्येक विधानसभेसाठी सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
नागपूर लोकसभा - अश्विन मुदगल (जिल्हाधिकारी)नागपूर दक्षिण-पश्चिम - शिरीष पांडे (उपविभागीय अधिकारी नागपूर शहर)दक्षिण नागपूर - जगदीश कातकर (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)पूर्व नागपूर - शीतल देशमुख (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)मध्य नागपूर - व्ही.बी. जोशी (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)पश्चिम नागपूर - ज्ञानेश भट - उपजिल्हाधिकारी-भूसंपादनउत्तर नागपूर - सुजता गंधे - उपल्हिाधिकारी राजस्वरामटेक लोकसभा- श्रीकांत फडके (अतिरिक्त जिल्हाधिकारी)काटोल - श्रीकांत उंबरकर (उपविभागीय अधिकारी-काटोल)सावनेर - संजय पवार - (उपविभागीय अधिकारी-सावनेर)हिंगणा - सूरज वाघमारे- (उपविभागीय अधिकारी-नागपूर-ग्रामीण)उमरेड - जे.पी. लोंढे -(उपविभागीय अधिकारी-उमरेड)कामठी - व्ही. सवरंगपत्ते (उपविभागीय अधिकारी-मौदा)रामटेक - जोगेंद्र कट्यारे (उपविभागीय अधिकारी-रामटेक)