शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

१०० सार्वजनिक गणेश मंडळांचे अर्ज : सुरक्षेबाबत आयुक्तांनी केली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:39 PM

कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

ठळक मुद्देशांतता समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.गणेशोत्सव राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि हे महापर्व १० दिवस चालते. नागपूर शहरातही दरवर्षी शेकडो मंडळे गणेशोत्सवासाठी अर्ज करतात. गेल्या वर्षी हा आकडा ९८३ होता. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे केवळ १०० मंडळांनी श्रींच्या स्थापनेसाठी पोलीस विभागाकडे अर्ज केला आहे. ही संख्या २०० ते २५० पर्यंत जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम करण्यासाठी ही चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या ११ जुलैच्या परिपत्रकानुसार उत्सव साजरा करण्यात येईल, असे शांतता समितीच्या सदस्यांना स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक मूर्ती ४ फूट व घरगुती गणेश मूर्ती २ फुटाची राहील. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र गोळा होता येणार नाही. पूजा किंवा आरतीदरम्यान गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. दर्शनाच्या वेळी सॅनिटायझर व मास्क वापरण्यासह शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील. विसर्जनाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.कृत्रिम टँकमध्येच करावे लागेल विसर्जनगणेश मंडळांनाही जवळच्या कृत्रिम टँकमध्येच विसर्जनाची परवानगी असेल. विसर्जनाची समस्या नसावी म्हणून मातीच्या मूर्तीऐवजी धातूची मूर्ती ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सांस्कृतिक आयोजनालाही बंदीसार्वजनिक गणेश मंडळातर्फे सांस्कृतिक आयोजन केले जाते पण यावर्षी अशा सर्व आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी अधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांना उत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे पालन करण्याचे आवाहन केले. सुरक्षित अंतर ठेवणे आणि गर्दीपासून दूर राहणे हेच कोविडपासून बचावाचे उपाय आहेत. शांतता समितीच्या सदस्यांनी नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. बैठकीत सहपोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्यासह सर्व सहआयुक्त व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयonlineऑनलाइन