लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे देशभरातील आरपीएफच्या सुरक्षा आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतिजा यांनी इलेक्ट्रॉनिक सीलचा गंभीर विषय रेल्वे मंत्र्यांपुढे मांडला. रेल्वेस्थानकावर भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे प्रवासी त्रस्त होतात. प्रवाशांचा त्रास दूर करण्यासाठी भिकाऱ्यांना रेल्वेगाड्या, स्टेशनबाहेर घालवून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूरसह देशभरातील आरपीएफ बॅरेकची सध्याची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा या मुद्यांकडे त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. बॅरेकचा विषय रेल्वेमंत्र्यांनी गंभीरतेने घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नागपूरसह देशभरातील बॅरेक सुसज्ज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर विभागात नागपूर आणि अजनी येथे आरपीएफ बॅरेक आहे. नागपुरात २० तर अजनी येथे ३० खाटांची संख्या आहे. सध्या अजनी बॅरेक अत्याधुनिक करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बॅरेकमध्ये बदली होऊन आलेले जवान राहतात. त्यांच्यासाठी प्रत्येकी एक बेड, गादी आणि आलमारी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जीम असतो. सतीजा यांच्या सूचनेमुळे देशभरातील आरपीएफ बॅरेकच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रेल्वे पार्सलवर कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक सील लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:34 AM
रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.
ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष : आरपीएफ बॅरेक करणार सुसज्ज