नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील शिपाई भरतीची जाहिरात वाढत्या बेरोजगारीचे उदाहरण ठरली. येथील शिपायाच्या एका पदामागे तब्बल अडीच हजारांवर उमेदवारांनी अर्ज सादर केले. विशेष म्हणजे त्यातील शेकडो उमेदवार उच्च शिक्षित होते.आॅगस्टमध्ये शिपायाची ३८ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्याकरिता तब्बल ९६ हजार ८४५ उमेदवारांनी अर्ज केले. किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदासाठी पात्र होते. परंतु, शेकडो उच्च शिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले. अर्ज पडताळणीनंतर ९६ हजार ८४५ मधून ३८० उमेदवार परीक्षेकरिता पात्र ठरले होते. त्यातील २८७ उमेदवारांनी परीक्षा दिली. शुल्कातून ४८ लाख रुपये मिळाले.
शिपायाच्या एका पदामागे अडीच हजारांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:51 AM