शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात शासकीय कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. निदर्शनानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणयात आले. या मागणीसाठी १२ ते १४ जुलै दरम्यान संप पुकारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. निवेदनाच्या माध्यमातून शासनालाही तसे कळविण्यात आले. निदर्शनात चंद्रहास सुटे, अशोक थुल, गजानन भोरड, अरविंद शेंडे, गोपीचंद कातुरे,राजू सुरुशे, अशोक दगडे, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, विठ्ठल जुनघरे, नाना कडबे, संजय तांबडे, गोपीचंद कातुरे, देवेंद्र शिदोडकर, स्नेहल खवले. प्रकाश डोंगरे, अरविंद शेंडे, नरेश मोरे, ज्ञानेश्वर महल्ले, प्रतिभा सोनारे आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी व शिक्षक सहभागी होते.
सातवा वेतना आयोग लागू करा
By admin | Published: June 17, 2017 2:27 AM