लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १६ टक्के इतकेच पीककर्ज वाटप झाले आहेत. त्यामुळे कर्जवाटपाची जबाबदारी संबंधित तहसीलदार व बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार पेरणीपूर्वी पीककर्ज उपलब्ध करून गावनिहाय नियोजन करा व सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १ हजार ८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ १६ टक्के कर्जवाटप झाले आहे. कर्जवाटप करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा २० टक्के, बँक ऑफ इंडिया १७ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र २० टक्के, कॅनरा बँक ३ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक २० टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ११ टक्के, युनायटेड बँक ऑफ इंडिया १४ टक्के, पीएनबी १ टक्का, इंडियन बँक एक टक्का असे एकूण राष्ट्रीयीकृत बँकांतर्फे केवळ १३ टक्के कर्जवाटप झाले आहे. खासगी बँकांमध्ये ॲक्सिस बँक ३ टक्के, एचडीएफसी बँक ७ टक्के, आयसीआयसीआय बँक १२ टक्के असे सरासरी केवळ ८ टक्के कर्ज वाटप केले आहे.
ग्रामीण बँकांतर्फे ३४ टक्के, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ४९ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँका मिळून केवळ १६ टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
बॉक्स
असे आहेत नोडल अधिकारी
तहसील तहसीलदार बँक अधिकारी भ्रमणध्वनी क्रमांक
नागपूर ग्रामीण मोहन टिकले प्रियंका यादव ७०२८२९८३९५
हिंगणा संतोष खांडरे अर्पिता कुमारी ९१४५२५६२६४
मौदा प्रशांत सांगडे गौतम जांभुळे ८२०८८५०९३६
कामठी अरविंद हिंगे मयूर कडवे ९७६७६८८११५
काटोल अजय चरडे बिनय प्रभाकर ८२०८७४५६०७
नरखेड धुनासिंग जाधव अण्णा ठाकरे ९८९३९४४१५०
सावनेर सतीश मासाळ प्रवीण ठाकरे ८४४६७५११९५
कळमेश्वर सचिन यादव अपूर्व्ह आर्या ९८९३९५६०९०
रामटेक बाळासाहेब मस्के डेविड डोंगरे ९६१७००२२२७
पारशिवणी वरुणकुमार सहारे सुधाकर मेश्राम ९०२८५३०२७१
उमरेड प्रमोद कदम समीर तेलंग ९१४६०३०६८६
भिवापूर अनिरुद्ध कांबळे गुणवंत कोसरे ९०४९२७८९१०
कुही बी.एन. तिनघसे अमित पाटील ८२७५९६६०५४