लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणाऱ्या ४१ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपामध्ये स्थायी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. सोमवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी तीन वारसदारांना नियुक्तीपत्र दिले. अन्य सफाई कर्मचाऱ्यांना संबंधित झोन कार्यालयातून स्थायी नियुक्ती पत्र देण्यात येईल.
महापौर कक्षात झालेल्या कार्यक्रमात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी गजेंद्र महल्ले, सहायक अधीक्षक किशोर मोटघरे, विशाल मेहता, नितीन कामडी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड आदी उपस्थित होते.
मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सेवा देत असताना मृत्यू झालेले किंवा निवृत्त झालेले, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना मनपामध्ये स्थायी सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले.