मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:37 PM2020-10-09T19:37:55+5:302020-10-09T19:39:38+5:30
Chief Engineer Prakash Khandare, Highcourt खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैधपणे करण्यात आली, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नाना बांगडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती अवैधपणे करण्यात आली, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नाना बांगडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
खंडारे यांची नियुक्ती २०१७ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित पदावर करण्यात आली. रेकॉर्डवर त्यांना ६७.६० गुण मिळाल्याचे दाखवण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात त्यांना कमी गुण मिळाले होते. खंडारे यांची नियुक्ती करताना गैरप्रकार करण्यात आला. यासंदर्भात ३१ ऑगस्ट रोजी ऊर्जा विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली, पण या प्रकरणात काहीच कारवाई करण्यात आली नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. खंडारे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा, त्यांना बडतर्फ करण्यात यावे आणि ऊर्जा विभागाचे सचिव, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य दक्षता अधिकारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहतील.