भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे यांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 08:15 PM2022-10-06T20:15:40+5:302022-10-06T20:17:22+5:30

Nagpur News भंडाऱ्याचे सुपुत्र असलेले न्यायिक अधिकारी यानशिवराज गोपिचंद खोब्रागडे यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointment of Yanshivraj Khobragade as High Court Judge | भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे यांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्ती

भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे यांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्ती

Next
ठळक मुद्देकेंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाद्वारे अधिसूचना जारी


नागपूर : भंडाऱ्याचे सुपुत्र असलेले न्यायिक अधिकारी यानशिवराज गोपिचंद खोब्रागडे यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या ७ सप्टेंबर रोजी न्या. खोब्रागडे यांच्यासह एकूण सहा न्यायिक अधिकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ती शिफारस मंजूर करून सर्व सहा न्यायिक अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करण्यात आले. त्यापैकी केवळ न्या. खोब्रागडे विदर्भातील आहेत. न्या. खोब्रागडे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करून वर आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही उच्च शिक्षणाशी संबंध आला नव्हता. न्या. खोब्रागडे यांना शिक्षणाची फार आवड होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आदर्श होते.

दरम्यान, शिक्षण व कामाच्या शोधात नागपुरात आल्यानंतर त्यांना चक्क राज्याचे दोनदा महाधिवक्ता राहिलेले विधिज्ञ अरविंद बोबडे यांचा आशीर्वाद लाभला. अरविंद बोबडे यांनी न्या. खोब्रागडे यांना स्वत:च्या घरी ठेवून घेतले व त्यांना शिकवले. न्या. खोब्रागडे यांनी त्यांच्याकडे राहून एम.कॉम. व एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. पुढे ते परीक्षा देऊन जिल्हा न्यायाधीश झाले.

दरम्यान, त्यांनी नागपूरमधील औद्योगिक व कामगार न्यायालयाचे सदस्य, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे व्यवस्थापक, औरंगाबाद, अकोला, अमरावती व अन्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश यासह विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करून स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आलेले इतर न्यायिक अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.

१ - संजय आनंदराव देशमुख

२ - महेंद्र वाढुमल चांदवाणी

३ - अभय सोपानराव वाघवासे

४ - रवींद्र मधुसुदन जोशी

५ - वृषाली ऊर्फ शुभांगी विजय जोशी

Web Title: Appointment of Yanshivraj Khobragade as High Court Judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.