लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच विभागात ते प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ कार्यरत आहेत. डॉ. मुनघाटे हे विद्यापीठातील भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचेही प्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुखपदही अनेक वर्षे सांभाळले आहे. मराठीतील अनेक मासिकांमधून त्यांचे साहित्य व सामाजिक विषयावरील लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात. डॉ. मुनघाटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यांवर काम केले आहे. भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचेदेखील ते सदस्य आहेत.