शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नागपूरच्या मेयो इस्पितळामध्ये  सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 9:21 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही(मेयो)आता प्लास्टिक सर्जरीपासून ते ‘युरोसर्जरी’, ‘सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मंगळवारी शासनाने मेयोच्या या सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देअतिविशेषोपचार तज्ज्ञाची सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीप्लास्टिक सर्जरीपासून ते कर्करोग रुग्णांना मिळणार उपचार

आॅनलाईन लोकमतनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही(मेयो)आता प्लास्टिक सर्जरीपासून ते ‘युरोसर्जरी’, ‘सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मंगळवारी शासनाने मेयोच्या या सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या विभागात सेवा देणारे सर्व मेयोचे माजी विद्यार्थी असून, ते नि:शुल्क सेवा देणार आहेत. या अतिविशेषोपचार तज्ज्ञांना शासनाने सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली आहे.गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये दिवसेंदिवस रुग्णांचा व्याप वाढत आहे. रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरूपातील शस्त्रक्रिया होत असल्या तरी अंत:स्रावशास्त्र(इन्डोक्रिनॉलॉजी),मूत्रशल्यचिकित्साशास्त्र(युरोसर्जरी), पचनसंस्थाशल्यचिकित्साशास्त्र(सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी),सुघटनशल्यचिकित्साशास्त्र(प्लास्टिक सर्जरी),मूत्रपिंडचिकित्साशास्त्र (नेफ्रालॉजी),कर्करोग विज्ञानशास्त्र(आॅन्कॉलॉजी) ही अतिविशेषोपचार विभाग(सुपर स्पेशालिटी)नव्हते. यामुळे या रुग्णांना मेडिकल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागायचे. येथे आधीच रुग्णांची गर्दी त्यात मेयोच्या रुग्णांची भर पडायची. यातच प्रत्येक विभागाचे दिवस ठरलेले असल्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची. उपचारात उशीर होण्याची शक्यता असायची. याची दखल मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. गरीब रुग्णांना अतिविशेषोपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला. सात विषयात नि:शुल्क सेवा देण्याचा प्रस्ताव मेयो प्रशासनाच्या पुढाकाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. शासनाने नि:शुल्क सेवा देण्याच्या अटीवर सेवा देणाऱ्या अतिविशेषोपचार तज्ज्ञांना सहायक प्राध्यापक नियुक्ती करून या योजनेलाच मंजुरी दिली.या विषयांची मिळेल सेवाअंत:स्रावशास्त्र(इन्डोक्रिनॉलॉजी),मूत्रशल्यचिकित्साशास्त्र(युरोसर्जरी),पचनसंस्थाशल्यचिकित्साशास्त्र(सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी), सुघटनशल्यचिकित्साशास्त्र(प्लास्टिक सर्जरी),मूत्रपिंडचिकित्साशास्त्र(नेफ्रालॉजी), कर्करोग विज्ञानशास्त्र (आॅनकॉलॉजी) आदी विषयांतर्गत येणाऱ्या रुग्णांना ही अद्ययावत सेवा मिळणार आहे.हे अतिविशेषोपचार तज्ज्ञ देतील सेवामेयोमध्ये डीएम इन्डोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. शैलेश पितळे, एमसीएच युरोसर्जरी डॉ. सदाशिव भोळे, एमसीएच सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सुधीर टोमे, एमसीएच प्लास्टिकसर्जन डॉ. समीर जहागीरदार, डीएम नेफ्रालॉजिस्ट डॉ. आश्विन खांडेकर, डीएम आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. अमोल डोंगरे व डॉ. रिया बल्लीकर आदी अतिविशेषोपचार तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत.सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुवर्ण सुरुवातसुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. याचा एक भाग म्हणून मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. याला मंजुरी मिळाल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा मिळेल.-डॉ. रवी चव्हाणनोडल अधिकारी, मेयो

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल