शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

अप्पू वाधवानीची सहा तास चौकशी

By admin | Published: May 12, 2017 2:52 AM

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याचा भागीदार म्हणून चर्चेत आलेला वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी याची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर

भूमाफिया ग्वालबन्सीचा भागीदार : अटक न झाल्यामुळे चर्चेला उधाण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याचा भागीदार म्हणून चर्चेत आलेला वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी याची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर गुन्हेशाखेतून मुक्तता करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ग्वालबन्सी प्रकरणात कुख्यात दिलीप, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांसोबतच अप्पू वाधवानीचेही नाव अनेक गुन्ह्याशी जुळले असल्याच्या आरोपामुळे अप्पूच्या सदरमधील हिरालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयासह तीन ठिकाणी विशेष तपास पथकांनी मंगळवारी धाडी घातल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी अप्पूच्या कार्यालयातून शेकडो कोटींच्या गैरव्यवहारांचा संशय आल्याने ५० पेक्षा जास्त फाईल्स जप्त केल्या होत्या. कुख्यात अप्पू वाधवानी भूमाफिया ग्वालबन्सीचा भागीदार म्हणून सर्वत्र कुपरिचित आहे. ग्वालबन्सीप्रमाणेच शहरातील अनेक जमिनी हडप करण्यात त्याचीही भूमिका असल्याची जोरदार चर्चा होती. दिलीप ग्वालबन्सीला अटक झाल्यापासून अप्पू कमालीचा सक्रिय झाला होता. त्याने विविध राजकीय नेत्यांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपण्याचेही प्रयत्न केले. त्यानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्याने या प्रकरणात समेट घडविण्यासाठी धावपळ केली. अनेकांना लाखोंचेआमिष दाखवून कारवाईचे बालंट टाळण्याचाही प्रयत्न केला होता. पोलीस दबावात आले ? अप्पू वाधवानी गुन्हे शाखेत पोहचण्यापूर्वीच पोलिसांवर त्याने दबाव वाढवला. आपल्याला अटक केली जाणार नाही, याचीही त्याने पध्दतशीर व्यवस्था केली होती. त्याचमुळे पोलीस दबावात आले आणि त्याला चौकशीच्या नावाखाली सहा तास गुन्हे शाखेत ठेवल्यानंतर रात्री मोकळे केल्याची जोरदार चर्चा आहे. संबंधित सूत्रांच्या मते अप्पू वाधवानी याच्या विरोधात ज्याने तक्रार केली होती, त्या व्यक्तीसोबत काहींनी समेट घडविण्यासाठी दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले होते. काहींनी एका तक्रारकर्त्याला धमकावले होते तर काहींनी दोन कोटी रुपयांच्या बदल्यात एका पीडिताचे तोंड बंद केल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता हे गंभीर प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.