नागपूर : ऑब्सेर्वेच्यावतीने वास्तूशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व य विषयावर परिसंवादाचे आयोजन झाले. वास्तूशास्त्रज्ञ व शहरी नवनिर्माण तज्ज्ञ निवेदित फडणीस यांनी वस्तू आरेखनतज्ज्ञ व वास्तूशास्त्रज्ञ मिलिंद गुजरकर यांच्याशी संवाद साधला. यात दैनंदिन जीवनातील वास्तूशास्त्रातील नवनिर्मिती, वस्तू आरेखनामागील सृजनशिलता, उत्तम वाचनाचे, स्व:जीवनातील अनुभव व वाचनाचे महत्त्व, वस्तू आरेखनाची कला यावर अनुभव कथन झाले. ऋग्वेद निमखेडकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कौस्तुभ निमखेडकर उपस्थित होते.
..............