शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:44 AM

ऑनलाईन क्लासेस व मिटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित होणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालकांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.

ठळक मुद्दे: पालक, प्रोफेशनल्सनी काळजी घेणे गरजेचे

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९चे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून देशभरात टाळेबंदी आहे. अशा स्थितीत अनेक कंपन्यांनी व शाळांनी ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आपली नियमित कामे करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, ऑनलाईन क्लासेस व मिटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित होणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालकांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.ऑनलाईन मिटिंग्ज म्हणा व क्लासेस घेताना संबंधितांना यात सहभागी होण्यासाठी लिंक फॉरवर्ड केली जाते. ही लिंक चुकीने दुसऱ्याच व्यक्तीपर्यंत पोहोचली तर तोही यात सहभागी होतो आणि वाममार्गाचा वापर करण्याची शक्यता असते. अशा बऱ्याच घटना पुढे आल्या आहेत. म्हणूनच ऑनलाईन क्लासेसच्या वेळी पालकांनी मुलांसोबत हजर असणे गरजेचे ठरते. यासोबतच प्रोफेशनल्स पर्सन्सनेही अशा लिंक फॉरवर्ड करताना सजग राहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपमध्ये सर्वच सहभागींना एकसाथ बघणे शक्य नाही. यासाठी स्क्रोल करत राहावे लागते. त्यामुळे मीटिंगमध्ये क्लासमध्ये कोण सहभागी आहे आणि जो सहभागी आहे तो संबंधितच आहे की नाही, याची निश्चिती नसते. म्हणूनच लिंक फॉरवर्ड करताना काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे.क्लास पूर्ण होताच मोबाईल करा दूर!ऑनलाईन क्लासच्या वेळी मुलांसोबत पालकांनी हजर असावे व क्लास आटोपताच मोबाईलपासून मुलांना दूर करावे. त्यामुळे, मुले क्लास वगळता मोबाईलचा वापर करणार नाहीत आणि मुलांना मोबाईल अ‍ॅडिक्ट होण्यापासून वाचवता येईल.संवेदनाहीन होण्याची भीतीसायबर विशेषज्ञांच्या मते, लोक ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपवरूनच संवाद साधायला लागतील तर प्रत्यक्ष भेटण्याचा काळ समाप्त होईल. त्यामुळे, एकमेकांच्या भावनांचे आदानप्रदान बंद होईल. प्रत्येकच जण ऑनलाईनलाच प्राधान्य देईल. म्हणून या व्यवस्थेचा उपयोग केवळ लॉकडाऊनमध्ये करण्याची भूमिकाच रास्त राहील.

टॅग्स :onlineऑनलाइन