शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले
2
सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही
3
IPL 2025: 'असंभव....'; चहलच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीनंतर RJ महावशची इन्स्टा स्टोरी अन् खास मेसेज 
4
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलीव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव
5
‘हनी ट्रॅप’पासून सावध राहा; गौरव पाटील प्रकरणात उच्च न्यायालयाचा इशारा
6
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण पोहोचलं संयुक्त राष्ट्रात, मुघलांच्या वारसांनी पत्र लिहून केली अशी मागणी 
7
सतत जांभई येणं सामान्य गोष्ट नाही; मोठ्या आजाराचे असू शकतात संकेत, कसा टाळाल धोका?
8
Gardening Tips: किचनमधले 'हे' तीन पदार्थ उन्हाळ्यातही तुमच्या रोपांना ठेवतील ताजे-टवटवीत!
9
प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन
10
चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन
11
अरेरे! गर्लफ्रेंडने विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडले, १५ फ्रॅक्चर; ७ वर्षांची लव्हस्टोरी, भयानक शेवट
12
बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा
13
दात पडला तर घाबरू नका, चक्क प्रयोगशाळेत तयार केला मानवी दात; पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील
14
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला?
15
युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  
16
केएल राहुलने सासरा सुनील शेट्टींसोबत मुंबईजवळ खरेदी केली ७ एकर जमीन; काय आहे किंमत?
17
'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
18
"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल
19
आरोग्य सांभाळा! चहा आणि कॉफी किती वेळानंतर होते खराब? निष्काळजीपणा ठरेल घातक
20
'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका

नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालयाचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 05:30 IST

सूत्रधार फहीम खानचे घर पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का, कोर्टाकडून विचारणा; बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपराजधानीमधील धार्मिक हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त करून महापालिकेला कडक शब्दांत फटकारले. हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का, त्यांची घरे पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का, असे परखड प्रश्न करून बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती दिली, तसेच पालिका आयुक्तांना नोटीस बजावून कारवाईवरील आक्षेपांवर १५ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

बुलडोझर कारवाईविरुद्ध फहीम खानची आई जेहरुनिस्सा शमीम खान व अब्दुल हफीजचा मुलगा मो. अयाज अब्दुल हफीज शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चिखलीमधील संजयबाग कॉलनी येथील फहीम खानचे घर न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच पाडण्याची कारवाई पालिकेने पूर्ण केली. महालमधील अब्दुल हफीजच्या घराचा काही भाग पाडण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई लगेच थांबविण्यात आली.

‘यूपी स्टाईल’ कारवाई, अवैध बांधकामावर हातोडा

दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानच्या घरावर अखेर नागपूर महानगरपालिका प्रशासनाचा ‘यूपी स्टाईल’ बुलडोझर चालला. संजयबाग कॉलनीतील फहीमच्या घरावर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. त्याचबरोबर महाल येथील जोहरीपुऱ्यातही अब्दुल हफीज शेखलाल यांचे अवैध बांधकाम तोडण्यात आले.

फहीम खानच्या जामीन अर्जावर सरकारला नोटीस : नागपूर सत्र न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला नोटीस जारी करून फहीम खान याच्या जामीन अर्जावर १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायाधीश आर. जे. राय यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

सरकारची भूमिका काय? : सर्वोच्च न्यायालयाच्या १३ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या निर्णयाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे नमूद करून मुख्य सचिवांना पुढच्या सुनावणीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :nagpurनागपूरMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ