लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर -
खर्ऱ्यामुळे दोन ठिकाणी वाद होऊन चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना प्रतापनगरात बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तर दुसरी घटना मानकापुरात रात्री ७.३० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. लोकेशच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी करून हल्ला करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दुसरी घटना बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास फरस चाैकात घडली. मयूर दिलीप धर्माळी (वय २५) हा आरोपी गुड्डू चंदेलच्या पानटपरीवर खर्रा घेण्यासाठी गेला होता. तेथे दोघात वाद झाल्यानंतर आरोपी गुड्डूने धर्माळीवर चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. मयूर धर्माळीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----