शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:53 AM

भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबन्शी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले.....

ठळक मुद्देमोक्का न्यायालयाचे आदेश : भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीने पचविल्या कोट्यवधीच्या जमिनी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबन्शी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले.ग्वालबन्शी दाम्पत्याची संपत्ती मोक्काच्या कलम २० (२)अंतर्गत जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी न्यायालयाला केला होता.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरधोकडा येथील रहिवासी असलेला दिलीप ग्वालबन्शी याला अपराध क्रमांक ८५/२०१७ मध्ये भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३८७, १४९ अंतर्गत अटक करण्यात आल्यानंतर, अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून १० जून २०१७ रोजी मोक्काअंतर्गतचे कलम ३ वाढविण्यात आले होते.ग्वालबन्शीच्या संपत्तीवर टाचआरोपीने लोकांच्या मनात दहशत निर्माण करून खंडणी वसुलीतून संपत्ती प्राप्त केलेली आहे. दिलीप ग्वालबन्शी हा कोणताही व्यवसाय करीत नाही, तो शेतकरीही नाही, तरीही त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती प्राप्त केली आहे. त्याने पत्नीच्या नावेही बरीच संपत्ती खरेदी केलेली आहे, असे तपास अधिकाºयाला तपासात निष्पन्न झाले. जप्त संपत्तीच्या निश्चितीबाबतही न्यायालयाने ग्वालबन्शी दाम्पत्याला नोटीस जारी करून २९ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविले आहे.आरोपीने लोकांच्या मनात दहशत निर्माण करून खंडणी वसुलीतून संपत्ती प्राप्त केलेली आहे. दिलीप ग्वालबन्शी हा कोणताही व्यवसाय करीत नाही, तो शेतकरीही नाही, तरीही त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती प्राप्त केली आहे. त्याने पत्नीच्या नावेही बरीच संपत्ती खरेदी केलेली आहे, असे तपास अधिकाºयाला तपासात निष्पन्न झाले. जप्त संपत्तीच्या निश्चितीबाबतही न्यायालयाने ग्वालबन्शी दाम्पत्याला नोटीस जारी करून २९ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविले आहे.अशी आहे संपत्तीदिलीप ग्वालबन्शीच्या नावे असलेल्या जप्त संपत्तीमध्ये कळमेश्वर तालुक्याच्या मौजा पिपळा (रिठी) येथील खसरा ७१, ७२ आणि ८० मधील ६.२० हेक्टर, येथीलच खसरा १०२ मधील ०.६० हेक्टर, मौदा तालुक्यातील खसरा ८६४ मधील ०.३५ हेक्टर, याच ठिकाणच्या खसरा ८५६, ८५७, ८५८, ९४४ आणि ९४५ मधील एकूण ७.७५ हेक्टर, मौजा गोरेवाडा येथील खसरा ८२/४ मधील ०.७८ हेक्टर, बोरगाव येथील खसरा ६१/३, ६१/४, ६१/५ मधील ४५०० चौरस मीटर, कामठी तालुक्यातील मौजा खैरी येथील खसरा १०८ मधील ३.५९ हेक्टर, गोरेवाडा खसरा ३०/२ मधील २.११ हेक्टर आणि ३१/२ मधील ०.६१ आणि मौजा हजारीपहाड येथील खसरा २/२ मधील ४ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.दिलीपची पत्नी शुभांगी हिच्या नावे असलेल्या जप्त संपत्तीमध्ये पिपळा (रिठी) येथील खसरा ६०, ६१/२ मधील १.३१ हेक्टर, खसरा ५९/१ मधील ०.९४, खसरा ५९/३ मधील ०.०४, खसरा ५८ मधील १.९८ हेक्टर, खसरा ७० मधील ३.७१ हेक्टर, खसरा ९५ मधील ३.३५ हेक्टर आणि येरला येथील खसरा ४/अ मधील २ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले.